शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोटमगाव परिसरात सोयाबीन पेरणीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 01:02 IST

मानोरी : येवला तालुक्यातील कोटमगाव खुर्द परिसरात मागील चार ते पाच दिवसांपूर्वी झालेल्या मान्सून पूर्वच्या समाधानकारक मुसळधार पावसामुळे येथील परिसरात खरीप हंगामातील सोयाबीन पिकांच्या पेरणीच्या कामाला शेतकऱ्यांनी सुरुवात केली असल्याचे दिसून आले आहे.

ठळक मुद्देमशागतींच्या कामांना शेतकऱ्यांनी सुरुवात

मानोरी : येवला तालुक्यातील कोटमगाव खुर्द परिसरात मागील चार ते पाच दिवसांपूर्वी झालेल्या मान्सून पूर्वच्या समाधानकारक मुसळधार पावसामुळे येथील परिसरात खरीप हंगामातील सोयाबीन पिकांच्या पेरणीच्या कामाला शेतकऱ्यांनी सुरुवात केली असल्याचे दिसून आले आहे.मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येवला तालुक्यातील बहुतांश भागात अवकाळी पाऊस बरसला होता. त्यामुळे यंदा वेळेआधीच शेती मशागतींच्या कामांना शेतकऱ्यांनी सुरुवात केली होती. कोटमगाव परिसरात मागील चार ते पाच दिवसांपूर्वी मान्सून पूर्व पावसाने वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. आणि याच मुसळधार पावसाच्या भरवशावर येथील शेतकऱ्यांनी प्रामुख्याने सोयाबीन पिकांच्या पेरणीस पसंती दर्शवली आहे.यंदा सोयाबीनच्या दराने आठ हजार रूपये प्रति क्विंटल चा टप्पा गाठला होता.त्यामुळे शेतकरी मोठ्या आशेने येथील परिसरात सोयाबीनची पेरणी करताना दिसून येत आहे. पाऊस समाधान कारक पडत असल्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे, रासायनिक खते खरेदी करण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून येत आहे. सोयाबीन च्या अनेक नवनवीन बियाणांची वाने सध्या बाजारात विक्रीसाठी आले असून दरवर्षी पेरण्यात येणाऱ्या वाणाची मात्र यंदा तुटवडा जाणवत असल्याचे शेतकरी वर्गाकडून सांगण्यात येत आहे.दरम्यान पावसाच्या भरवशावर पेरणी सुरू असली तरी यापुढे शेतकऱ्यांना दमदार पावसाची शेतकऱ्यांना गरज असून पाऊस न पडल्यास शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडणार असल्याचे देखील शेतकरी वर्गाकडून सांगण्यात येत आहे.मुसळधार पावसाच्या भरवशावर जमिनीत बऱ्यापैकी ओलावा निर्माण झाल्याने आम्ही सोयाबीन पेरणीच्या कामांना सुरुवात केली आहे. सोयाबीन च्या चांगल्या वाणाची कमतरता असून मिळेल ते बीयाने घेऊन पेरणी चालू आहे. पेरणी झाल्यानंतर पण आम्हा शेतकऱ्यांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा असून पाऊस न पडल्यास पुन्हा चिंता वाढणार आहे.- गोकुळ कोटमे, शेतकरी, कोटमगाव खुर्द.(०८ मानोरी १)मुसळधार पावसाच्या भरवशावर कोटमगाव येथे ट्रॅक्टरच्या सहाय्याने सुरू असलेली सोयाबीन पेरणी.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी