शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन, कापसाचे  पीक धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 01:05 IST

अगोदरच उशिराने केलेली पेरणी व त्यातच तीन आठवड्यांहून अधिक काळ पावसाने मारलेल्या दडीमुळे नाशिक जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन व कापूस पीक धोक्यात आले असून, पावसाअभावी सोयाबीनला लागणाऱ्या फुलांच्या संख्येत घट झाली

नाशिक : अगोदरच उशिराने केलेली पेरणी व त्यातच तीन आठवड्यांहून अधिक काळ पावसाने मारलेल्या दडीमुळे नाशिक जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन व कापूस पीक धोक्यात आले असून, पावसाअभावी सोयाबीनला लागणाऱ्या फुलांच्या संख्येत घट झाली तर कापसाचे बोंडाची वाढ खुंटल्यामुळे पिकाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना त्यात आता या दोन्ही पिकांना किडीचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.  जिल्ह्यात जून महिन्यात उशिराने मान्सूनचे आगमन झाल्यामुळे त्याचा पेरणीवर परिणाम झाला, परंतु जुलैच्या पावसाने शेतकºयांच्या आशा पल्लवीत होऊन जिल्ह्यात जवळपास जुलैअखेर ८८ टक्के पीक पेरण्या पूर्ण करण्यात आल्या. नाशिक जिल्हा खरीप पेरणीचा असल्यामुळे पूर्व भागात मका, बाजरी, सोयाबीन, तूर, भुईमुगाची लागवड करण्यात आली, तर पश्चिम भागात भात, नागलीच्या पेरण्या करण्यात येऊन पिकांना कोंब फुटेपर्यंत पावसाने हात दिला, परंतु त्यानंतर जवळपास तीन आठवड्यांहून अधिक काळ पावसाने दडी मारली. जिल्ह्यातील एकूण लागवडीखाली क्षेत्रापैकी ५९,३४३ इतके क्षेत्र सोयाबीनचे असले तरी, यंदा मात्र त्यात वाढ करण्यात येऊन ६४,२६३ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली तर कापसाचे क्षेत्र काहीसे घटले आहे. कापसाचे ४५,५३५ हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी फक्त ३७,१५५ हेक्टर क्षेत्रावरच लागवड करण्यात आली. त्यामागे गेल्या वर्षी बोंडअळीने उभे पीक फस्त केल्यामुळे कापूस उत्पादक शेतकºयांमध्ये नैराश्य आल्याचे व पावसाने दीर्घ दडी मारल्याचे कारण दिले जात आहे.  आता दोन दिवसांपासून पावसाने काहीशी हजेरी लावली असली तरी, तत्पूर्वी या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव सुरू झाल्याचे कृषी खात्याचे म्हणणे आहे. सोयाबीनची पाने खाणारी अळी काही भागांत आढळली तर कापसावरही यंदा बोंडअळीची तसेच पिकाचे रस शोषणाºया किडीचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे.  जुलैअखेर व आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात सोयाबीनच्या शेंगा लागण्याअगोदर फुले लागण्यास सुरुवात होते व अशा वेळी पिकाला पाण्याची गरज असते; परंतु पाऊस नसल्यामुळे हजारो हेक्टरवरील सोयाबीन पीक धोक्यात आले, तीच परिस्थिती कापसाची असून, पिकाची पाते व फुले लागण्याच्या अवस्थेत असताना कापसाची वाढ खुंटली परिणामी कापसाचे फूल फुलण्याअगोदर तयार होणाºया बोंडाची पाहिजे त्या प्रमाणात वाढ होऊ शकली नाही.

टॅग्स :Farmerशेतकरीcottonकापूस