चौकय-
सोयाबीनचे दर (प्रति क्विंटल)
जानेवारी २०२०-४२१३
जून २०२०-३६१८
ऑक्टोबर २०२०-३९३७
जानेवारी २०२१-४४००
जून २०२१-७२०१
सप्टेंबर २०२१-७५९०
सोयाबीनचा पेरा (हेक्टरमध्ये)
२०१८ - ६९४५२
२०१९ - ७३५३६
२०२० - ८६१८४
२०२१ - ९७८०१
चौकट-
खोऱ्याने पैसा ओतला, आता काय करू?
कोट-
यंदा सोयाबिनला चांगला दर मिळण्याची अपेक्षा होती. सुरुवातीला पावसाने दगा दिला असला तरी पिकासाठी खर्च कमी केला नाही. खत, औषध फवारणी, निंदणी यांचा खर्च वाढला तरीही कर्ज काढुन तो पूर्ण केला. आता पिक हाताशी येत असताना अचानक भाव कोसळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता खर्चतरी फिटेल की नाही याची चिंता लागली आहे. - प्रविण दौंडे, शेतकरी
कोट-
कधी नव्हे ते यावर्षी सोयाबिन पेरतानाच चार गोण्या खादीच्या टाकल्या त्यानंतर दर वाढुनही निंदणी करुन घेतली. मध्यंतरी अळीचा प्रभाव दिसु लागताच फवारणीचे दोन हात दिले पिक जोमात आहे. यामुळे यंदा सोयाबिन कर्ज फेडेल असे वाटत होते. पण आतातर भाव निम्यावर आले आहेत त्यामुळे केलेला खर्च तरी निघतो की नाही असा प्रश्न पडला आहे. - दिनकर रसाळ , शेतकरी
कोट-
विकण्याची घाई करू नका !
सोयाबिन पुन्हा दहा-अकरा हजारांवर जाईल अशी अेपक्षा ठेवणे चुकीचे ठरेल. हंगाम सुरु झाल्यानंतर सर्वच कंपण्यांना माल मिळत असतो त्यामुळे दर पाच हजारांपुढे जातील किंवा नाही याची शाश्वती नाही. सिजन संपल्यानंतर भाव सात हजारांपर्यंत जातीलही पण तोपर्यंत शेतकऱ्यांकडील मालाचे वजन कमी होते. मालाची प्रतही घसरते यासाठी माझ्यादृष्टीने मिळणाऱ्या दरात सोयाबिन विकले तर ते फायद्याचे ठरु शकते. - पवन जाजू, व्यापारी