प्रवीण दोशी ।वणी : अतिवृष्टीमुळे सोयाबीन उत्पादनात आलेल्या घटीमुळे दर गगनाला भिडण्याच्या व्यापाऱ्यांच्या संकेताने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेले गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. दिंडोरी तालुक्यात सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात येते. सोयाबीनवर रोेगाच्या प्रादुर्भावाची शक्यता कमी व हमखास आर्थिक स्थैर्य देणारे अशी ओळख आहे. दरम्यान, सोयाबीन हे प्रामुख्याने धुळे येथे विक्री करण्यात येते. सोयाबीनच्या पावडरपासून तेल तयार करणे, प्रोटिन्स तयार करणाºया पदार्थांमध्ये वापरणे, सोयाबीनची वडी तयार करणे असा वापर सोयाबीनचा करण्यात येतो.मात्र प्रामुख्याने धुळे येथील आॅइल मिलमध्ये तेल उत्पादनासाठी सोयाबीन खरेदी करणाºया अनेक मिल आहेत. हे सर्व सोयाबीन त्याठिकाणी विक्रीसाठी जाते. दरम्यान, खरेदी करण्यापूर्वी विविध मशीनद्वारा दर्जा प्रतवारी या बाबी निकषाच्या कसोटीला पार पडल्या तर चांगला भाव देण्यात येतो. निकष पूर्ण झाले नाही तर माल नाकारण्यात येतो. दरम्यान, भूतकाळात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन या पिकाची प्रचंड हानी झाली आहे. त्यामुळे उत्पादनात घट आली आहे. तरीही उर्वरित राहिलेले सोयाबीन सुरक्षित राहून विक्र ी करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू होती. तालुक्यात अनेक व्यापारी सध्या सोयाबीन खरेदीत गुंतवणूक करत आहेत.माल खरेदी करून वेअर हाऊस तसेच गुदामामध्ये साठवणूक केला. मात्र दरात कमालीची घसरण झाली आहे. त्यामुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ४५०० रु पये क्विंटल असा दर काही दिवसांपूर्वी होता. आता हाच दर ३५०० ते ४००० रु पये प्रतिक्विंटलपर्यंत दर खाली आले आहेत. दरम्यान कोरोनाचा फटका सोयाबीनला बसल्याचा सूर उमटत आहे. सोयाबीनच्या टरफलाचा वापर पशुखाद्य व कोंबड्यांच्या खाद्यात करण्यात येतो मात्र वर्तमान स्थिती व जागतिक मंदीच्या तडाख्यात शेतकरीवर्ग सापडला असून, कांदा, टमाटा, मका या पाठोपाठ सोयाबीनचे दरही घसरल्याने शेतकरीवर्ग कोंडीत सापडला आहे.
जिल्ह्यात सोयाबीनचे दर घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 00:21 IST
प्रवीण दोशी । वणी : अतिवृष्टीमुळे सोयाबीन उत्पादनात आलेल्या घटीमुळे दर गगनाला भिडण्याच्या व्यापाऱ्यांच्या संकेताने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेले ...
जिल्ह्यात सोयाबीनचे दर घसरले
ठळक मुद्देगुंतवणूकदार हवालदिल । अवकाळीचा फटका; नुकसानीचे संकट