शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

दक्षिणेकडील कांदा बाजारात; भावात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 00:47 IST

लासलगाव : दक्षिण भारतातील नवीन कांद्याची बंगळुरू येथील बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावर आवक सुरू झाल्याने अन्य बाजारांमधून उन्हाळ कांद्याला असलेली मागणी कमी झाली आहे. परिणामी येथील आशियातील सर्वात मोठ्या बाजारपेठेत गुरुवारी कांद्याच्या दरामध्ये क्विंटलमागे ९५ रुपयांची घट झाली आहे.

ठळक मुद्देमागणीमध्ये घट : उत्पादक चिंतित

लासलगाव : दक्षिण भारतातील नवीन कांद्याची बंगळुरू येथील बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावर आवक सुरू झाल्याने अन्य बाजारांमधून उन्हाळ कांद्याला असलेली मागणी कमी झाली आहे. परिणामी येथील आशियातील सर्वात मोठ्या बाजारपेठेत गुरुवारी कांद्याच्या दरामध्ये क्विंटलमागे ९५ रुपयांची घट झाली आहे.बंगळुरू येथील कांदा बाजारपेठेत गुरुवारी एक लाख सत्तर हजार नवीन कांदा गोण्यांची आवक झाली. दक्षिणेतील राज्यातून नवीन कांदा मोठ्या प्रमाणावर बाजारपेठेत येण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे मागील पंधरवड्यात २५५० रुपयांपर्यंत असणारे कांदा भाव कमी झाले. या सप्ताहात भावात ५०० रुपयांची घसरण झाली. अन्य बाजारपेठांमधून मागणी कमी झाल्याने लासलगावला सरासरी भाव १३०० रुपयांच्या आसपास आहेत. दरम्यान, गुरुवारी येथे बाजारभाव ९५ रुपयांनी कमी झाले आहेत. दक्षिणेतील राज्यांमधील नवीन कांदा बाजारात आल्याने गेले काही दिवस भाव खाणारा उन्हाळ कांदा मंदीकडे वाटचाल करीत असल्याचे कांदा व्यापारी नितीनकुमार जैन यांनी ‘लोकमत’ला सांगितले.लासलगाव बाजार समितीत गुरुवारी उन्हाळ कांदा भावात आदल्या दिवसापेक्षा ९५ रुपयांची घट झाली. कमाल भाव १९१२ रुपये तर सरासरी भाव १४६० रुपये राहिला. चालू सप्ताहात सरासरी भावात २५० रुपयांची घट झाली आहे.लासलगावच्या बाजारपेठेत नेहमी आॅक्टोबर महिन्यात लाल कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत असते; परंतु यंदा विलंबाने आलेला पाऊस व नंतर त्याने दिलेली ओढ यामुळे खान्देशातील कांदा अद्याप बाजारात आलेला नाही. दि. २२ रोजी लासलगाव बाजारपेठेत नवीन लाल कांद्याची आवक १८० क्विंटल झाली. भाव कमाल १४०० रुपये राहिला.किरकोळ तेजीतचघाऊक बाजारात कांद्याचे दर कमी होत असले तरी किरकोळ बाजारात मात्र कांद्याचे भाव तेजीतच आहेत. नाशिक शहरात सुमारे २५ रुपये तर मुंबईमध्ये कांदा ५० रुपये प्रतिकिलो या दराने विकला जात आहे. कांद्याच्या या दरवाढीने सर्वसामान्यांच्या डोळ्यात मात्र पाणी आले आहे.