शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिवमंदिरांमध्ये बम बम भोलेचा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 01:20 IST

महाशिवरात्रीनिमित्त परिसरातील मंदिरांमध्ये भाविकांनी बम बम भोलेचा गजर केला़ झोडगे येथील हेमाडपंती मंदिरात यात्रोत्सव झाला़ महादेव घाटावरील शिवमंदिरात भाविकांनी दर्शन घेतले़ संगमेश्वर परिसरात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते.

ठळक मुद्देमहाशिवरात्री : मालेगाव कॅम्प येथील मंदिरात पूजा; संगमेश्वर येथील मंदिरात अभिषेक

मालेगाव : महाशिवरात्रीनिमित्त परिसरातील मंदिरांमध्ये भाविकांनी बम बम भोलेचा गजर केला़ झोडगे येथील हेमाडपंती मंदिरात यात्रोत्सव झाला़ महादेव घाटावरील शिवमंदिरात भाविकांनी दर्शन घेतले़ संगमेश्वर परिसरात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते.महादेव घाटावरील पुरातन राजेबहाद्दर यांच्या मंदिरात महादेव सेवा समितीने पहाटेपासूनच मंदिर भाविकांसाठी खुले केले होते. दिवसभर येथे भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. सकाळी ६ वाजता व रात्री ८ वाजता तसेच सायंकाळी ७ वाजता प्रमुख मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली. आस्था महिला भजनी मंडळ, भावसार भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला. सामुदायिक शिवस्तुती पठण व सामुदायिक भजनात कार्यकर्ते सहभागी झाले होते. महादेव सेवा समितीचे अध्यक्ष पंकज मुंदडा, उत्सव प्रमुख प्रवीण बच्छाव, उपप्रमुख रमेश मंडाळे, महादू मंडाळे, राजेश वाजपेयी, संतोष जाधव, कैलास सोनवणे, कृष्णा पाटील, गणेश फुलदेवरे आणि कार्यकर्त्यांनी कार्यक्रमासाठी प्रयत्न केले. शिवलीलामृत पारायणाचा कार्यक्रम दुपारी झाला. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई, भगवे झेंडे, पताका लावण्यात आल्या होत्या. भाविकांनी मनोभावे शंकराची पूजा केली. कॅम्पातील आपला दवाखानाच्या वतीने यावेळी रक्तदान शिबिर घेण्यात आले.येथील सर्व मंदिरासह मोसमनदी जवळील घाटावर असलेल्या पुरातन महादेव मंदिरात महाशिवरात्री- निमित्ताने मंदिर परिसरात विद्युत रोषणाई व सजावट करण्यात आली होती. भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी लोखंडी जाळी, सीसीटीव्ही यंत्रणा लावण्यात आली आहे. स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते. मंदिरात धार्मिक विधीसह राजस्थानी भजनी मंडळ, महिला भजनी मंडळाचे भजन, कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. तीनही सत्रात महाआरती करण्यात आली, तर सांजआरती उपमहापौर नीलेश आहेर यांच्या हस्ते करण्यात आली.महादेव सेवा समितीतर्फे सामुदायिक शिवस्मृती पठण करण्यात आले. मंदिर प्रशासनातर्फे साबुदाणा खिचडीचा प्रसाद वाटप करण्यात आला, तर रात्री महाआरती नंतर महाप्रसाद दुधाचे वाटप करण्यात आले.यावेळी महादेव सेवा समिती, जय शंकर भजनी मंडळाचे पदाधिकाऱ्यांसह समितीचे अध्यक्ष पंकज मुंदडा, उत्सव प्रमुख प्रवीण बच्छाव, रमेश मंडाळे, राजेश वाजपेयी, कृष्णा पाटील, विवेक वारुळे, खेमचंद तलरेजा, महारु मंडाळे, हेमंत चौधरी, विश्वनाथ लिंगायत, महादेव भक्तांसह शहरातील नागरिक उपस्थित होते.मालेगाव कॅम्प परिसरात विविध महादेव मंदिरात धार्मिक विधी संपन्न झाले़ तर येथील मोसम नदी घाटावरील पुरातन महादेव मंदिरात पहाटेपासून महाशिवरात्रीनिमित्ताने अभिषेक, आरती व दर्शन घेण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. शहरातील महादेव घाटावरील महादेव मंदिर, संगमेश्वर झांजेश्वर मंदिर, सोयगाव, कॅम्प, कॅम्प रस्ता, रावळगाव नाका परिसरातील विविध शिवमंदिरांमध्ये शिवरात्रीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.झोडगेतील हेमाडपंती मंदिरात यात्रोत्सव झोडगे : माळमाथा परिसरातील ५६ गावांची बाजारपेठ समजल्या जाणाºया झोडगे गावात प्राचिन हेमाडपंती माणकेश्वर महादेवाच्या मंदिरात यात्रोत्सव झाला़ महादेवाच्या दर्शनासाठी आबालवृद्धांनी रांग लावली होती. विशेष म्हणजे महाशिवरात्रीनिमित्त परिसरातील अनेक भाविक भगवान माणकेश्वराच्या दर्शनासाठी येऊन नवस फेडतात. गावातून रथयात्रा काढण्यात आली़ महाशिवरात्रीच्या दुसºया दिवशी कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात येते. विशेष म्हणजे या ठिकाणी नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातून पहिलवान कुस्तीच्या दंगलीसाठी येत असतात. विशेष म्हणजे याठिकाणी दीडशे वर्षांची जुनी परंपरा या मंदिराला आहे. यंदादेखील माणकेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमReligious Placesधार्मिक स्थळे