शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

आत्मा मालिक ध्यानपीठाची मिरवणूक

By admin | Updated: September 5, 2015 23:00 IST

गोदाघाट : तणावानंतर ‘आत्मध्यान’

नाशिक : सदगुरू ओम गुरूदेव माउली तथा आत्मा मालिक ध्यानपीठ परिवाराच्या वतीने शनिवारी संध्याकाळी साधुग्राममधून भव्य दिंडी काढण्यात आली.तपोवनातून प्रारंभ करण्यात आलेली दिंडी गणेशवाडीमार्गे, नवीन शाहीमार्गाने गौरी पटांगणावरून रामकुंडावर पोहचली. ही मिरवणूक साधुग्राममधील आखाड्यातील साधू-महंतांनी जुन्या शाहीमार्गावर अडविल्यामुळे दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली होती. यावरून साधुग्राम परिसरात काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते. आत्मा मालिक ध्यानपीठ परिवाराने आखाड्यांच्या महंतांचा निषेध म्हणून रामकुंडावर स्नान न करता केवळ आत्मध्यान करणे पसंत केले.आत्मा मालिक ध्यानपीठच्या वतीने यंदा प्रथमच कुंभमेळ्यानिमित्त साधुग्राममध्ये इंद्रायणी लॉन्स, तपोवनात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आखाडे व खालशांच्या पहिल्या शाहीस्नानामध्ये आत्मा मालिक ध्यानपीठाचा सहभाग नव्हता. त्याऐवजी शनिवारी दुपारी ३ वाजता काढण्यात आलेल्या मिरवणुकीच्या प्रारंभी राज्याचे उद्योगमंत्री प्रकाश मेहता, पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार बाळासाहेब सानप आदि मान्यवरांनी आरती के ली. एकूण ३४ चित्ररथ, वाहने सहभागी झाली होती. यावेळी रथावर ओम गुरूदेव जंगलीदास महाराज, देवानंद महाराज, परमानंद महाराज आदिंसह २५० साधू-संत विराजमान होते. तसेच विदेशी भाविकांचे पथक देखील या मिरवणुकीत सहभागी झाले होते. स्केटिंग पथक, विद्यार्थ्यांचे ढोल पथक, लेझीम पथक, झांज पथक, बॅण्ड पथक आदिंचे दहा पथक होते. त्यापाठोपाठ छत्र, चामरे, भगवे झेंडे हातात घेऊन नृत्य करणारे भाविकांनी लक्ष वेधले. नऊवारी सारी परिधान करून फुगडी नृत्य करणाऱ्या महिला दिंडीचे आकर्षण ठरले. सदर मिरवणूक साधुग्राममध्ये अडविण्यात आल्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करून तत्काळ तणाव निवळण्याचा प्रयत्न केला. आणि सदर मिरवणूक वजा दिंडी औरंगाबाद रस्त्याने वळविण्यात आली. यामुळे भाविकांचा हिरमोड झाला होता. त्याचप्रमाणे मार्ग लांब पल्ल्याचा झाल्यामुळे दिंडीमध्ये सहभागी महिला, ज्येष्ठ भाविक, मुले यांची पायपीट झाली.