जायखेडा : जयपूर-मेंढीपाडे ता. बागलाण येथे विजेचा धक्का लागून गोराणे येथील स्वप्निल काकाजी गवळी (२५ ) या तरूणाचा जागीच मृत्यू झाला.जयपूर-मेंढीपाडे येथे अंगणवाडी इमारतीचे बांधकाम चालू असून, या बांधकामावर गवळी हा तरु ण मजूर म्हणून काम करीत होता. दि. १४ आॅगष्ट रोजी तो या बांधकामावर पाणी मारण्यासाठी गेला असता येथील वीज पंपात विद्युत पुरवठा उतरल्याने त्याचा धक्का लागून मृत्यू झाला. या प्रकरणी जायखेडा पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सपोनि गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. राजेंद्र सावळे करीत आहेत. (१६ स्वप्निल गवळी)
विजेच्या धक्कयाने तरूणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 13:02 IST