आस्थापना सुरू करण्यात आल्याने विविध दुकानांत नियम पायदळी तुडविल्याचे बघायला मिळाले.
नियम शिथिल केल्यामुळे रस्त्यावर पोलीस आणि मनपाचे दिसणारे पथक सोमवारी दिसेनासे झाले होते. पंचवटीत सर्व दुकाने सुरू झाल्याने नागरिकांनी तोबा गर्दी केली. त्यात विविध कपडे दुकाने, सलून, गॅरेज, किराणा दुकान, हार्डवेअर
यासह बँकेत देखील नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या.
प्रशासनाने नियम शिथिल करून नागरिकांना विशेषतः सर्व दुकानदारांना नियमांचे पालन करण्यासाठी सूचना दिल्या असल्या तरी दुकानदार आणि नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांना केराची टोपली दाखविली.
दुपारी होळकर पुलावर तसेच रामवाडीतील घारपुरे घाटावर चारचाकी वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. पुलावर झालेल्या वाहनांच्या गर्दीमुळे अनेक वाहनधारकांनी रस्ता बदलून अन्य मार्गाने वाहने नेत वाहन कोंडीतून सुटका करून घेतली. शासनाने कोरोना
नियम शिथिल केले खरे मात्र नागरिक नियम पालन करत नसल्याने आगामी काळात कोरोना रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.