शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस सुरू होताच पुन्हा वाहनांची घसरगुंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 18:42 IST

लखमापूर : दिंडोरी - नाशिक हा रस्ता पावसाळ्यात मुख्य चर्चेचा विषय बनला आहे तो गाड्याची घसरगुंडीमुळे. दिंडोरी तालुक्यात जवळजवळ एक महिन्याच्या विश्रांतीनंतर रविवारपासून बऱ्यापैकी पावसाला सुरुवात झाली आणि दिंडोरी - नाशिक रस्त्यावर वाहनांच्या घसरगुंडीला पुन्हा सुरुवात झाली.

ठळक मुद्देदिंडोरी - नाशिक रस्ता : अपघातांमुळे बनला धोकादायक

लखमापूर : दिंडोरी - नाशिक हा रस्ता पावसाळ्यात मुख्य चर्चेचा विषय बनला आहे तो गाड्याची घसरगुंडीमुळे. दिंडोरी तालुक्यात जवळजवळ एक महिन्याच्या विश्रांतीनंतर रविवारपासून बऱ्यापैकी पावसाला सुरुवात झाली आणि दिंडोरी - नाशिक रस्त्यावर वाहनांच्या घसरगुंडीला पुन्हा सुरुवात झाली.

सध्या लखमापूरफाटा ते अक्राळे फाट्यापर्यंत पावसाळ्यात वाहनांच्या घसरगुंडीमुळे जागोजागी गतिरोधक बसविले आहेत. त्यामुळे गाड्यांच्या वेगावर नियंत्रण आले होते. पण पाऊस नसतांना गाड्या सरळ निघून जातात. थोडा जरी पाऊस झाला की, गाड्यांच्या घसरगुंडीचे प्रमाण परत वाढते. आतापर्यंत जवळजवळ ३० ते ४० छोट्या, मोठ्या वाहनांचे अपघात झाले आहेत. अनेक वाहनचालक जखमी झाले होते. रस्ता अतिशय गुळगुळीत झाल्याने गाडीचा ब्रेक थोडा जरी दाबला तर लगेच गाडी बाजूला नागमोडी वळण घेऊन पलटी होते. त्यामुळे हा रस्ता धोकादायक बनला आहे.ठोस उपाययोजनांची मागणीलखमापूर फाटा ते अक्राळे फाटा हा रस्ता अत्यंत गुळगुळीत झाल्याने पावसाळ्यात गाड्या घसरगुंडीचे प्रमाण वाढले आहे. संबंधित खात्याने या रस्त्यावर गतिरोधक बसविले. त्याने तात्पुरता फरक पडतो. पण पावसाचे प्रमाण वाढले की, परत गाड्या घसरगुंडीचे प्रमाण वाढते. त्यामुळे वाहनधारकांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागतो. संबंधित खात्याने काही ठोस उपाययोजना राबवावी, अशी मागणी होत आहे.फोटो- १२ दिंडोरी रेन

टॅग्स :Rainपाऊसroad safetyरस्ते सुरक्षा