शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

शिवजन्मोत्सव सोहळ्याबाबत लवकरच निर्णय : भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 01:11 IST

नाशिकमध्ये साजऱ्या होणाऱ्या शिवजन्मोत्सवाच्या पारंपरिक मिरवणुकांबाबत दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहरातील मंडळांना दिले. 

ठळक मुद्देपारंपरिक मिरवणुकीबाबत सकारात्मक निर्णयाची विनंती

नाशिक : नाशिकमध्ये साजऱ्या होणाऱ्या शिवजन्मोत्सवाच्या पारंपरिक मिरवणुकांबाबत दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहरातील मंडळांना दिले. शिवजन्मोत्सवानिमित्त पारंपरिक मिरवणुकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करत परवानगी देण्यात यावी या मागणीसाठी आज नाशिकमधील शिवजन्मोत्सव समिती व शहरातील विविध मंडळाच्या सदस्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. त्यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सर्व मंडळ प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ उपस्थित होते. यावेळी छत्रपती सेना महाराष्ट्र राज्य, पंचवटी शिवजन्मोत्सव समिती, नवीन नाशिक शिवजन्मोत्सव समिती, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान, भाई समाज मित्र मंडळ, शिकसाई फ्रेंड सर्कल, लष्कर ए शिवबा, अशोकस्तंभ साईबाबा मित्र मंडळ, गजानन मित्र मंडळ, जुने नाशिक फ्रेंड सर्कल, शिवसेना प्रणित अर्जुन क्रीडा मंडळ, आत्मविश्वास व्यायामशाळा, गर्जना युवा प्रतिष्ठान, हिंदूसम्राट मित्र मंडळ, धर्मवीर ग्रुप सिडको, मराठा मित्र मंडळ सातपूर, शिवमुद्रा प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नाशिकमध्ये सध्या कोरोना रुग्ण संख्या कमी होत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र पुन्हा कोरोना वाढणार नाही याची काळजी आपण सर्वांना घ्यावी लागणार आहे. त्या अनुषंगाने सर्व मंडळांनी प्रशासनास सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. शिवजन्मोत्सव मिरवणुकीबाबत कोरोनाच्या नियमांचे पूर्णपणे पालन करून शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावा यासाठी येत्या दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना सांगितले.या वर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून मिरवणुकीस परवानगी मिळण्याबाबत अडचणी आहे. त्यामुळे सर्व मंडळांच्या वतीने यंदा १९ फेब्रुवारी रोजी कोरोनाच्या नियमांचे पालन करून शासकीय तारखेनुसार जयंती साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनाच्या नियमांचे पालन करत शिवजयंती उत्सव साजरा करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी केली.

टॅग्स :NashikनाशिकChhagan Bhujbalछगन भुजबळ