शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

सोनई हत्याकांड; सहा खुन्यांना फाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 00:26 IST

नाशिक : संपूर्ण राज्याला हादरवून टाकणारे अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथील तिहेरी हत्याकांडातील दोषी सहाही आरोपींना शनिवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.आर. वैष्णव यांनी फाशीची शिक्षा सुनावली. ‘तुमचे कृत्य माणुसकीला काळिमा फासणारे तर आहेच; परंतु तुम्ही ज्या निर्दयतेने हे हत्याकांड घडविले ते पाहता तुम्ही सैतानही आहात, तुम्ही जिवंत राहणे हे समाजासाठी धोकेदायक आहे’, अशा शब्दात न्यायालयाने निकालपत्रात ताशेरे ओढत अवघ्या दहा मिनिटांत न्यायालयाचे कामकाज स्थगित केले.

ठळक मुद्देकृत्य माणुसकीला काळिमा फासणारे; न्यायालयाची टिप्पणीअवघ्या दहा मिनिटांत न्यायालयाचे कामकाज स्थगित

नाशिक : संपूर्ण राज्याला हादरवून टाकणारे अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथील तिहेरी हत्याकांडातील दोषी सहाही आरोपींना शनिवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.आर. वैष्णव यांनी फाशीची शिक्षा सुनावली. ‘तुमचे कृत्य माणुसकीला काळिमा फासणारे तर आहेच; परंतु तुम्ही ज्या निर्दयतेने हे हत्याकांड घडविले ते पाहता तुम्ही सैतानही आहात, तुम्ही जिवंत राहणे हे समाजासाठी धोकेदायक आहे’, अशा शब्दात न्यायालयाने निकालपत्रात ताशेरे ओढत अवघ्या दहा मिनिटांत न्यायालयाचे कामकाज स्थगित केले.या हत्याकांडात न्यायालयाने रमेश विश्वनाथ दरंदले (३९), प्रकाश विश्वनाथ दरंदले (३४), पोपट ऊर्फ रघुनाथ विश्वनाथ दरंदले (४८), गणेश ऊर्फ प्रवीण पोपट दरंदले (१९) सर्व रा. गणेशवाडी (विठ्ठलवाडी) सोनई, तालुका नेवासा, अशोक सुधाकर नवगिरे (२८) व संदीप माधव कुºहे (३३) रा. खरवंडी, ता. नेवासा यांना सोमवारी दोषी ठरविले होते, तर अशोक रोहिदास फलके, रा. लांडेवाडी, सोनई यास दोषमुक्त केले होते. त्यामुळे शनिवारी न्यायालय काय निकाल देते याकडे साºयांचे लक्ष लागून होते.सवर्ण जातीच्या मुलीशी प्रेमप्रकरण असल्याच्या संशयावरून आरोपींनी सचिन सोहनलाल घारू (२६), संदीप राजू थनवार (२४) व राहुल राजू कंडारे ( २६) सर्व रा. त्रिमूर्ती कॉलेज, नेवासा फाटा या तिघा तरुणांचा अतिशय निर्दयपणे १ जानेवारी २०१३ रोजी खून केला होता. २अतिशय गाजलेल्या, जातीयवादाची परिसीमा गाठलेल्या व संवेदनशील असलेल्या या खटल्याचे अहमदनगर जिल्ह्यात पडसाद उमटण्याची शक्यता पाहून नाशिकच्या न्यायालयात हा खटला सुनावणी-साठी वर्ग करण्यात आला होता.कुºहेचा निकालानंतर संतापअपिलाची मुदत कशाला, लगेचच फाशी द्या़ देशात इंग्रजच बरे होते, निकाल लागला की लगेच फासावर लटकवायचे़ मी दलित आहे याचा उल्लेख निकालात का नाही, डॉ़बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य दिले आहे़ मी तुमच्या शिक्षेमुळे नाही तर मी माझ्याच पद्धतीनेच मरणाऱ येत्या दोन-तीन दिवसांत मी मरेल, मला तुमच्या फाशीच्या शिक्षेची गरजच पडणार नाही, असा संताप आरोपी संदीप कुºहे याने न्यायाधीश आपल्या निजी कक्षात गेल्यानंतर व्यक्त केला़पीडितांना मदत नाहीचसोनई हत्याकांडातील मयतांच्या नातेवाइकांना सरकारी नोकरी तसेच आर्थिक मदतीचे आश्वासन देण्यात आले होते़ मात्र, मयत सचिन घारू व राहुल कंडारे व संदीप थनवार यांच्या नातेवाइकांनी सरकारडून अशा प्रकारची कोणतीही मदत मिळाली नसल्याचे सांगितले़, तर न्यायाधीश वैष्णव यांनी मयतांच्या कुटुंबीयांना सरकारी मदतीबाबत विचारले असता विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरकारी मदत मिळाल्याचे सांगितले़