नाशिक : दक्षिण कोरियातील सेऊल येथे होणाऱ्या नॅशनल अमॅच्युअर बॉडीबिल्डर्स असोसिएशनच्या जागतिक अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी नाशिक ग्रामीण पोलीस दलातील व सध्या मालेगाव येथे ट्रॅफिक हवालदार असलेले भगवान सोनवणे यांची निवड झाली आहे. सदरची स्पर्धा १९ तारखेपासून होत आहे. नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण साळुंके यांनी सोनवणे यांचा सत्कार केला यावेळी दीपक बागुल उपस्थित होते.
शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी सोनवणेची निवड
By admin | Updated: June 10, 2014 00:15 IST