शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर ओरबाडली सोनसाखळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 16:03 IST

पोलिसांची घेराबंदी, नाकाबंदी अपयशी ठरत असून सोनसाखळीचोर मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत आहे. मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या सोनसाखळीचोरीच्या घटनेमुळे हे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्दे. अशोकामार्ग पुन्हा एकदा या घटनेमुळे चर्चेतसोनसाखळी चोरी, मोबाईल चोरी, पर्सचोरीच्या घटनांनी या भागातील रहिवाशी जेरीस

नाशिक : शहरात सोनसाखळी चोरीच्या घटना सातत्याने घडत असून या घटना रोखण्यास पोलिसांना अपयश येत आहे. पोलिसांची घेराबंदी, नाकाबंदी अपयशी ठरत असून सोनसाखळीचोर मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत आहे. मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या सोनसाखळीचोरीच्या घटनेमुळे हे स्पष्ट झाले आहे. अशोकामार्ग पुन्हा एकदा या घटनेमुळे चर्चेत आला आहे.अशोका मार्गावरील उद्यानापासून सिध्देश अपार्टमेंटकडे जाणाऱ्या रस्त्यावर अज्ञात चोरट्याने पल्सर दुचाकीवरुन भरधाव येत जोत्सना शिवाजी वाघ (४८,रा. मातोश्री कॉलनी, खोडेनगर) यांची सोनसाखळी अशोका शाळेच्या पुढे ओरबाडली. सुमारे २३ हजार रुपये किंमतीची ११.७६०ग्रॅम वजनाची सोनसाखळी चोरट्याने हिसकावून पळ काढला. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी घटना घडली तेथून अशोका मार्ग पोलीस चौकी अवघ्या हाकेच्या अंतरावर आहे. बुधवारी (दि.२२) संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली. वाघ या पायी घराकडे येत असताना चोरट्याने डाव साधला. मागील तीन ते चार दिवसांपासून अशोका मार्गावर दोन ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी सुरू आहे. तरीदेखील गुन्हेगारीच्या घटना घडत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.सोनसाखळी चोरी, मोबाईल चोरी, पर्सचोरीच्या घटनांनी या भागातील रहिवाशी जेरीस आले आहे. चोरट्यांचा उपद्रव कमी पडतो की काय त्यात अजून टवाळखोर रोडरोमियोंची भर पडत असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. पोलिसांचे गस्ती वाहन पुढे अन् चोरटे मागे अशी अवस्था या मार्गावर असते. पोलीस वाहन पुढे गेले की मागे गुन्हेगारीच्या घटना घडतात. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरिक्षक एस.जी.सोनोने करीत आहेत.

टॅग्स :Womenमहिलाnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय