शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ज्या मुलाला लहानाचे मोठे केले त्यानेच जन्मदात्या बापाचा घात केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 14:25 IST

भगवान एडके यांच्या डोक्यात पहाटेच्या सुमारास सिध्दार्थ याने दगडी पाटा हाणून ठार मारल्याचे फिर्यादीत किशोर याने म्हटले आहे. रक्ताच्या थारोळ्यात आपल्या पोटच्या मुलाला बघून फिर्यादीच्या आजीने जोरात हंबरडा फोडला.

ठळक मुद्देअनैतिक संबंधाच्या संशयावरून वाद घालत मारहाण करत होता.आजीला मारहाण करून जखमी केले

नाशिक : उपनगर परिसरातील गौतमनगर भागात एडके कुटुंबप्रमुख भगवान नामदेव एडके (६५) यांच्या डोक्यात त्यांचा मोठा मुलगा संशयित सिध्दार्थ एडके याने गुरूवारी (दि.२८) पहाटे पावणेपाच वाजेच्या सुमारास पाटा टाकून खून केल्याची धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी त्याचा धाकटा भाऊ किशोर याने दिलेल्या फिर्यादीवरून उपनगर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गौतमनगर भागात मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे एडके कटुंबीय वास्तव्यास आहे. मयत भगवान हे आपल्या आई, दोन मुले, सुना नातवंडांसोबत राहत होते. मोठ्या मुलाच्या खोलीत झोपलेले भगवान एडके यांच्या डोक्यात पहाटेच्या सुमारास सिध्दार्थ याने दगडी पाटा हाणून ठार मारल्याचे फिर्यादीत किशोर याने म्हटले आहे. रक्ताच्या थारोळ्यात आपल्या पोटच्या मुलाला बघून फिर्यादीच्या आजीने जोरात हंबरडा फोडला असता फिर्यादी किशोर हा खोलीत धावून आला. त्यावेळी सिध्दार्थ याच्या हात रक्ताने माखलेले होते व त्याने आजीला मारहाण करून जखमी केले . त्याने किशोरवरदेखील चाल करत मारहाण करण्याचा प्रयत्न केला. सिध्दार्थ हा नेहमीच त्याच्या वडिलांसमवेत अनैतिक संबंधाच्या संशयावरून वाद घालत मारहाण करत होता. सुमारे पाच महिन्यांपुर्वीदेखील त्याने काठीने मारहाण करत मयत भगवान यांचे डोके फोडले होते; मात्र त्यांनी त्यावेळी लहान नातवंडांना डोळ्यापुढे ठेवून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास नकार दिला होता. तसेच सिध्दार्थने चार दिवसांपुर्वीच त्यांच्याशी पुन्हा त्याच संशयावरून वाद घालत रात्रीच्या सुमारास हाताने चापटीने मारहाण केली होती, असे फिर्यादीत किशोर याने म्हटले आहे. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी संशयित आरोपी सिध्दार्थविरूध्द जबर मारहाण, खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच प्रत्यक्षदशाी साक्षीदार मयत भगवान यांच्या आई, भाऊ, सिध्दार्थची पत्नी यांचा जबाबही नोंदविला आहे. याप्रकरणी पुढील तपास उपनगर पोलीस करत आहेत.

टॅग्स :Murderखूनnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय