शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सद्भावनेच्या लढाईतील सुपुत्र : अनिल अवचट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:30 IST

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिक्षणतज्ज्ञ अरुण ठाकूर यांच्या रूपाने समाजाने सद्भावनेच्या लढाईतील एक सुपुत्र गमावला आहे. आजच्या काळात त्यांच्यासारखा धर्मनिरपेक्ष विचारांचा माणूस होणे हा त्या वृत्तीचा एकप्रकारे पराभव ठरतो, अशी भावना ज्येष्ठ लेखक डॉ. अनिल अवचट यांनी व्यक्त के ली.

नाशिक : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिक्षणतज्ज्ञ अरुण ठाकूर यांच्या रूपाने समाजाने सद्भावनेच्या लढाईतील एक सुपुत्र गमावला आहे. आजच्या काळात त्यांच्यासारखा धर्मनिरपेक्ष विचारांचा माणूस होणे हा त्या वृत्तीचा एकप्रकारे पराभव ठरतो, अशी भावना ज्येष्ठ लेखक डॉ. अनिल अवचट यांनी व्यक्त के ली.ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अरु ण ठाकूर यांची स्मरणसभा वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प. सा. नाट्यगृहात मंगळवारी (दि.२६) झाली. यावेळी अवचट बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, शांताराम चव्हाण, ‘आनंदनिकेतन’च्या मुख्याध्यापक विनोदिनी काळगी यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी अवचट म्हणाले, ठाकूर यांच्याशी आपली बहुधा जन्मापासून मैत्री असावी. आयुष्यात अत्यंत वाईट दिवस काढणाऱ्या अरु ण यांनी कोणत्याही कामाची कधीही लाज बाळगली नाही. प्रत्येक गोष्टीत विनोद शोधण्याची सवय त्यांच्यामुळे लागली. ठाकूर हे विविध संदर्भांचा महाकोश होते असे ते म्हणाले़ तसेच पाटील म्हणाले, अरुण ठाकूर हे पुरोगामी विचारसरणीचे होते. पुरोगामित्व त्यांच्या अंगभूत होते. ठाकूर यांच्यासारखी दीपकलिका नाशिकच्या निरांजनात उभी राहते, हे मोठे भाग्यच म्हणावे. गांधी, आंबेडकर समजावून सांगणाऱ्या ठाकूर यांच्याशी वेगळेच नाते जोडले गेले होते, असे शांताराम चव्हाण यांनी सांगितले. आनंदनिकेतन शाळेची भूमिका, पायाभूत तत्त्वे ठरविण्यामध्ये तसेच शाळेच्या प्रगतीमध्ये ठाकूर यांचे मोठे योगदान राहिले आहे, असे विनोदिनी काळगी यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, निशा शिऊरकर, सुनीती सु. र., मंगला खिंवसरा, वासंती दिघे, अर्जुन कोकाटे, श्रीधर देशपांडे, करुणासागर पगारे यांनीही भावना व्यक्त केल्या. अनिता पगारे यांनी सूत्रसंचालन केले.माणसांवर प्रेम करणारा माणूसपुरोगामी आचार, विचारांमुळे धर्मनिरपेक्ष वृत्तीने हा माणूस आयुष्यभर जगत आला. समाजवादी चळवळीपुढे ठाकूर यांच्या रूपाने असलेला आदर्श काळाने हिरावला असल्याचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी यावेळी भावना व्यक्त करताना सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक