शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

रेव्ह पार्टीमधील आणखी काही संशयित फरारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 01:30 IST

वैद्यकीय चाचणीदरम्यान संकलित केलेले रक्त, लघवीचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठविले गेले आहे..., या नमुन्यांचा तपासणी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही...तसेच काही संशयित अद्यापही फरार असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. नायजेरियन व्यक्तीने पुरविलेल्या कोकेनसारखे अमली पदार्थ कुठून मिळविले याचाही तपास अद्याप सुरू आहे....’अशाप्रकारे सरकारपक्षाकडून इगतपुरीमधील हवाईयन रेव्ह पार्टीच्या गुन्ह्यात न्यायालयाकडे संशयितांची पोलीस कोठडी वाढविण्याची मागणी करण्यात आली.

ठळक मुद्देसरकार पक्षाचा युक्तिवाद : न्यायालयाने जामीन फेटाळला

नाशिक : वैद्यकीय चाचणीदरम्यान संकलित केलेले रक्त, लघवीचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठविले गेले आहे..., या नमुन्यांचा तपासणी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही...तसेच काही संशयित अद्यापही फरार असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. नायजेरियन व्यक्तीने पुरविलेल्या कोकेनसारखे अमली पदार्थ कुठून मिळविले याचाही तपास अद्याप सुरू आहे....’अशाप्रकारे सरकारपक्षाकडून इगतपुरीमधील हवाईयन रेव्ह पार्टीच्या गुन्ह्यात न्यायालयाकडे संशयितांची पोलीस कोठडी वाढविण्याची मागणी करण्यात आली. न्यायालयाने युक्तिवाद ग्राह्य धरत या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत २५ संशयितांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.एका दिवसाच्या कोठडीची मुदत संपत असल्याने इगतपुरी पोलीसांनी २९ संशयितांपैकी उर्वरित बॉलिवूड अभिनेत्री संशयित हिना पांचाल, श्रृती शेट्टी, चांदणी भटिजा, ऋचिका नार्वेकर, ज्योती नाईक, करिश्मा शेट्टी, प्रीती चौधरी, शयाना लांबा, अशिता शर्मा, सिना गबलानी, विभा गोंडोलीया यांसह एकूण १२ महिला व संशयित अमित लाट, आशिष लाट, राजेश त्रिवेदी, विशाल मेहता, अबुबकर शेख, रोहित अरोरा, सुशांत सावंत, संदीप भोसले, राकेश कांगो, फैजान बेग, इराणी अझार फारनुद, दानिश खान, राजू मगरे, भगवान माळी यांसह १३ संशयित असे एकूण २५ संशयित आरोपींना इगतपुरी न्यायालयात मंगळवारी पोलिसांनी हजर केले. दरम्यान, या सर्वांकडून वकिलाने न्यायालयाकडे जामीन अर्ज केला; मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावला आणि यांना येत्या ५ जुलैपर्यंत पोलीस कोठवडी सुनावली. एनडीपीएसच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी बर्थ-डे बॉय पीयूष शेठीया, हर्ष शहा, निरज सुराना, नायझेरीयन नागरिक उमाही पीटर यांची न्यायालयाने सोमवारीच नऊ दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.  सरकार पक्षाकडून ॲड. मिलिंद निर्लेकर यांनी युक्तिवाद केला. रणवीर सोनी आज न्यायालयातज्या दोन बंगल्यांमध्ये तीन दिवसीय रेव्ह पार्टी रंगविण्याचा बेत आखला गेला होता. त्या बंगल्यांचा मालक रणवीर सोनी यास पोलिसांनी मुंबईतून मंगळवारी (दि.२९) ताब्यात घेतले. त्यास संध्याकाळी इगतपुरी पोलीस ठाण्यात अटक दाखविण्यात आले. बुधवारी (दि.३०) सोनी यास इगतपुरी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

दृष्टिक्षेपात युक्तिवादघटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुरावे यावेळी पोलिसांनी न्यायालयात सादर केले. यामधून अमली पदार्थांचे सर्रास सेवन केले जात असल्याचे दिसून येते. तसेच एका तरुणीच्या खिशात ड्रग्जदेखील पोलिसांना अंगझडतीत मिळून आले असून, त्याचाही तपास सुरू असल्याचे सरकारपक्षाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालय