शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

‘कळसुबाई’ शिखरावर सैनिकांनी फडकावला तिरंगा! 'हर शिखर तिरंगा’ मोहिमेत देशातील २८पर्वत करणार सर!

By अझहर शेख | Updated: August 16, 2023 14:47 IST

दोन तासांत शिखरमाथा गाठल्यानंतर तेथील मंदिराजव या चमूच्या सैनिकांनी तिरंगा मोठ्या अभिमानाने अन् सन्मानाने फडकाविला.

नाशिक : हलका-मध्यम सरींचा वर्षाव अंगावर झेलत भारतमातेचा जयजयकार करत सैन्याच्या ‘ॲडव्हेंचर विंग’च्या चमूने मंगळवारी (दि.१५) राज्यातील सर्वोच्च शिखर असलेल्या कळसुबाईवर चढाई सुरू केली. दोन तासांत शिखरमाथा गाठल्यानंतर तेथील मंदिराजव या चमूच्या सैनिकांनी तिरंगा मोठ्या अभिमानाने अन् सन्मानाने फडकाविला.

भारतीय सैन्यदलातील कर्नल रणवीर सिंह जामवाल यांच्या नेतृत्वात मे महिन्यात ‘हर शिखर तिरंगा’ ही आगळीवेगळी साहसी मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत देशभरातील २८ राज्यांमध्ये भ्रमंती करत तेथील सर्वोच्च शिखरावर चढाई करून तिरंगा फडकाविला जात आहे. मंगळवारी या चमूने कळसुबाईच्या रूपाने १५वे सर्वोच्च शिखर सर केले. हा चमू राजस्थानच्या गुरूशिखर, गुजरातचे गिरणार आणि मध्यप्रदेशच्या धूपगडावर तिरंगा फडकावून स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येला नाशिक शहरात दाखल झाला होता. या चमूने मंगळवारी (१५) पहाटे कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी पोहचला. कळसूबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून १ हजार ६४६ मीटर इतकी आहे, तर पायथ्याच्या बारी गावातून याची ऊंची अंदाजे ९०० मीटरपर्यंत आहे. 

झुंजुमुंज होताच जामवाल यांच्यासह १३सैनिक व स्थानिक युवकांनीसुद्धा हातात तिरंगा ध्वज खेत भारतमातेचा जयघोष केला. एकमेकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत कळसूबाई शिखरावर चढाई सुरू केली. सकाळी आठ वाजता माथा गाठून ध्वजारोहण करत तिरंग्याला ‘सॅल्यूट’ केला. यावेळी स्थानिक युवक, युवतींनी जल्लोषपूर्ण वातावरणात देशभक्तीपर घोषणा देत शिखर दणाणून सोडला. यानंतर पुढील प्रवासात दुपारी मुंढेगावातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसोबत जामवाल यांनी संवाद साधला. त्यानंतर नाशिकमधून पुढे गोव्याच्या दिशेने प्रवास सुरू केला.ऑगस्टमध्ये या शिखरांवर फडकवणार तिरंगाऑगस्टअखेरपर्यंत सैनिकांचा हा चमू २४ तारखेला गोव्यामधील उच्चशिखर सोसोगडावर त्यानंतर २६ तारखेला कर्नाटकच्या मुलनगिरी शिखर, २७ तारखेला तमिळनाडूमधील दोटाबेटा पर्वतावर आणि २८ तारखेला केरळमधील अनामुरी शिखरावर हा चमू तिरंगा फडकावणार आहे. ही मोहीम अशीच पुढे सर्व २८ राज्यांत पोहचणार आहे. ऑक्टोबरमध्ये मोहिम ‘फत्ते’ होणार आहे.

..असा आहे साहसवीरांचा चमूकर्नल रणवीर सिंह जामवाल, सुभेदार रवी देवडकर, तेसांग चोसगेल, हवालदार केवल, नेहपाल सिंह, राकेश यादव, नायक गणेश पाल, संजय कुमार, लोगु के., लोबसंग बापू, रूपक छत्री, थुटेन, राजा रामचिराय, समयाक राज मेहता असा १४ सैनिकांचा हा चमू आहे. या चमूने आतापर्यंत देशातील १४शिखरे लीलयापणे सर केली आहेत. 

टॅग्स :NashikनाशिकIndependence Dayस्वातंत्र्य दिन