शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

सैनिक, शहीदांच्या कुटूंबियांची घरपट्टी माफीवरून प्रशासन धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 19:06 IST

२२ जुलै २०१९ रोजी झालेल्या स्थायी समितीच्या पहिल्याच सभेत माजी सभागृहनेते पाटील यांनी सदरचा प्रस्ताव सादर करत माजी सैनिक, शहीदांचे कुटुंबिय तसेच स्वातंत्र्यसैनिकांच्या सदनिकांवरील घरपट्टी माफ करण्याचा प्रस्ताव मांडला होता.

ठळक मुद्देचार महिन्यांपासून ठराव पडून : स्थायी समितीत कारवाईचा इशाराठरावाबाबत शासनाकडे मार्गदर्शन

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : माजी सैनिक, शहीदांच्या कुटुबियांना तसेच स्वातंत्र्यसैनिकांना औरंगाबाद आणि ठाणे महापालिकेच्या धर्तीवर नाशिक शहरातही घरपट्टी माफ करण्याचे आदेश देवून चार महिने उलटूनही त्याची अंमलबजावणी न केल्याबद्दल स्थायी समिती सभापती उद्धव निमसेंनी शनिवारी प्रशासनाची झाडाझडती घेतली. स्थायी समितीने केलेल्या ठरावाची येत्या आठ दिवसात अंमलबजावणी झाली नाही तर जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करू असा इशारा त्यांनी दिला.

उध्दव निमसे यांच्या अध्यक्षतेखाली २२ जुलै २०१९ रोजी झालेल्या स्थायी समितीच्या पहिल्याच सभेत माजी सभागृहनेते पाटील यांनी सदरचा प्रस्ताव सादर करत माजी सैनिक, शहीदांचे कुटुंबिय तसेच स्वातंत्र्यसैनिकांच्या सदनिकांवरील घरपट्टी माफ करण्याचा प्रस्ताव मांडला होता. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच महापालिका हद्दीतील माजी सैनिक व स्वातंत्र्यसैनिकांच्या सदनिकांवरही महापालिका घरपट्टी आकारते. सदर सदनिकांवरील घरपट्टी माफ केल्यास मनपाच्या अर्थसंकल्पावर कोणत्याही प्रकारचा मोठा ताण पडणार नाही. त्यामुळे महापालिकेने देखील माजी सैनिक, स्वातंत्र्यसैनिकांच्या सदनिकांवरील घरपट्टी माफ करून त्यांनी केलेल्या देशसेवेचा यथोचित सन्मान करावा, अशी सूचना पाटील यांनी मांडली. सभापती निमसे यांनी तत्काळ मंजूरी देवून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. परंतु,या निर्णयाला चार महिने उलटून देखील त्याची अंमलबजावणी झाली नसल्याची तक्रार पाटील यांनी शनिवारच्या सभेत केली. त्यावरून सभापती निमसे यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. अधिकाºयांना स्थायी समितीचे अधिकार माहिती नसतील तर, त्यांनी अभ्यास करून घ्यावे असा टोलाही त्यांनी लावला. सभापतींनी झाडाझडती केल्यानंतर विविध कर विभागाचे उपायुक्त प्रदीप चौधरी यांनी निमसेंची भेट घेवून त्यांच्याकडे या प्रस्तावाबाबत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला.स्थायी समितीने ठराव दिल्यानंतर आयुक्तांनी सदर ठरावाबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागवल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.त्याबाबतचे पत्रच त्यांनी सभापतींसमोर सादर केले. त्यानंतर सभापतींनी मनपा ही स्वायत्त संस्था असून या ठरावाबाबत मार्गदर्शनही मागवण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले.

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिकाNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका