शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सौर पंप दोन वर्षापासून मंजूर;‌ पण सुरू कधी होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 00:17 IST

निकवेल : बागलाण तालुक्यातील किकवारी बुद्रुक येथील वागदर वस्तीत २ वर्षांपूर्वी ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत सौर पंप मंजूर झाला होता. जिल्हा परिषद सदस्य साधना गवळी यांच्या हस्ते उद्घाटनही झाले. उद्घाटन झाल्यानंतर चार ते पाच महिन्यात फक्त तेथे बोअर करण्यात आला. बोअर केल्यावर तेथे चांगले पाणीही लागले. त्या दोन वर्षांपासून तो बोर तसाच प्लास्टिक पिशवीने झाकलेला आहे. नंतर त्या बोअरकडे फिरकूनही पाहिले नाही. परिसरातील रहिवासी तो सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

ठळक मुद्देकिकवारी बुद्रुकच्या ग्रामस्थांना प्रतीक्षा

आदिवासी वस्तीत नागरिकांना पाणी पुरवठ्यासाठी एकाच हातपंपाची सोय आहे. त्यामुळे येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी रात्रीचा दिवस करावा लागतो. किकवारी बुद्रुक ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या येथील वागदर वस्तीत आदिवासी कुटुंबे वास्तव्यास आहेत. ही सर्व कुटुंबे मोलमजुरीने उदरनिर्वाह करतात. मजुरीवर असल्याने दिवसभर काम करून सायंकाळी पाण्यासाठी धावपळ करावी लागते. नाहीतर आपली मजुरी बुडवून कुटुंबातील किमान एका सदस्याला घरातील पाणी भरण्यासाठी घरी राहावे लागते. वागदर वस्तीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंगणवाडी आहे. शाळा सुरू राहिल्यास विद्यार्थ्यांना हात पंपाचा पाण्याचा पिण्यासाठी वापर करावा लागतो. पाण्याची तेथे कोणतीही सोय नाही; मात्र सौर पंप मंजूर असूनही वस्तीतील लोकांना हात पंपावरील पाण्याचा वापर करावा लागतो.जिल्हा परिषद सदस्य यांना वेळोवेळी संपर्क केआ असता ठेकेदार पुढच्या आठवड्यात काम चालू करत आहे, असे प्रत्येक वेळेस सांगतात; पण तो पुढचा आठवडा कधी दोन वर्षांपासून उगवला नाही. तरी जिल्हा परिषद सदस्य साधना गवळी यांनी ठेकेदाराला सांगून वागदर वस्तीवरील सौर पंपाचे काम लवकरात लवकर करून तेथील पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटवावा, अशी मागणी वागदर वस्तीवरील ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत