शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सौरऊर्जेवर पथदर्शी प्रकल्प साकारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:35 IST

विंचूरसह १६ गावे पाणीपुरवठा योजनेसाठी सौरऊर्जेचा पथदर्शी प्रकल्प राबविणार असल्याची माहिती पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी दिल्याची माहिती लासलगाव सोळा गाव समितीचे अध्यक्ष जयदत्त होळकर यांनी दिली.

लासलगाव : विंचूरसह १६ गावे पाणीपुरवठा योजनेसाठी सौरऊर्जेचा पथदर्शी प्रकल्प राबविणार असल्याची माहिती पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी दिल्याची माहिती लासलगाव सोळा गाव समितीचे अध्यक्ष जयदत्त होळकर यांनी दिली.  लोणीकर यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आमदार जयंत जाधव यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नावरील उत्तरात लासलगाव - विंचूरसह १६ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी वर्षाला ५४ ते ६० लाख रु पये फक्त वीजबिल येते. त्यामुळे लासलगाव विंचूरसह १६ गावांसाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी जिल्हा वार्षिक नावीन्यपूर्ण योजनेतून सौर सयंत्र मंजूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे दि. २३ फेब्रुवारी व दि. ४ सप्टेंबर २०१७ रोजी मागणी केली होती. राज्य सरकारकडून सौरऊर्जेचा वापर वाढण्यासाठी नवीन योजना आणल्या जात आहे. त्या माध्यमातून १६ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी एकरकमी एक कोटी ७५ लाख रु पये खर्च करून सौरऊर्जा प्रकल्प राबविल्यास विजेची बचत होईल तसेच ही योजना सुरळीतपणे सुरू राहील, असे जयदत्त होळकर यांनी सांगितले. यावेळी हेमंत टकले यांनी गाव पाणीपुरवठा योजनेसाठी सौरऊर्जाचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात यावा यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा.  वीजबिल भरण्यासाठी पैसे नसल्याने विविध ग्रामीण पाणीपुरवठा योजना या बंद पडतात. त्यामुळे राज्याच्या ऊर्जामंत्र्यांसमवेत राज्यतील ग्रामीण पाणीपुरवठा योजना या सौरऊर्जेवर करण्यासाठी बैठक झाली असून, सदर योजना पायलट प्रोजेक्ट (पथदर्शी प्रकल्प) म्हणून राबविण्यासाठी ऊर्जा विभागाच्या महाव्यवस्थापक व जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात येत आहेत. सौरऊर्जेचा पायलट प्रकल्प राबविण्याची मागणी देशात आदर्श व योजनेसाठीदेखील सौरऊर्जाचा पायलट प्रकल्प राबविण्यात यावा. या योजनेला कर्नाटक, तामिळनाडूसह इतर राज्यातील सचिवांनी भेटी दिल्या आहेत. त्यामुळे सदर प्रकल्प देशभरातील पाणीपुरवठा योजनांसाठी रोल मॉडेल आहे. त्यामुळे या चांगल्या योजनांसाठी राज्याचा ऊर्जा विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व नावीन्यपूर्ण योजनेच्या माध्यामातून निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी केली.

टॅग्स :Nashikनाशिक