शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

सोग्रसला जि.प. शाळेत विलगीकरण कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 00:51 IST

चांदवड : तालुक्यातील सोग्रस या अवघ्या १,५४२ लोकसंख्या असलेल्या गावाने आदर्श निर्माण करत शासनाच्या मदतीची वाट न बघता जिल्हा परिषदेच्या शाळेतच विलगीकरण कक्षाची स्थापना केली आहे. जमिनीवरच सुमारे २५ ते ३० गाद्या टाकून गावातील रुग्णांची सोय केली आहे.

ठळक मुद्देचांदवड : गावपातळीवर रुग्णसंख्येत झाली घट

चांदवड : तालुक्यातील सोग्रस या अवघ्या १,५४२ लोकसंख्या असलेल्या गावाने आदर्श निर्माण करत शासनाच्या मदतीची वाट न बघता जिल्हा परिषदेच्या शाळेतच विलगीकरण कक्षाची स्थापना केली आहे. जमिनीवरच सुमारे २५ ते ३० गाद्या टाकून गावातील रुग्णांची सोय केली आहे.गावातील संस्थात्मक विलगीकरणामुळे येथील रुग्णसंख्या आता केवळ सहावर आली आहे. विलगीकरणामुळे रुग्ण कमी होण्यास मदत झाल्याची माहिती माजी सभापती भास्कर गांगुर्डे, सरपंच परशराम गांगुर्डे, उपसरपंच मीराबाई शिंदे, ग्रामसेवक पुष्पा भोये यांनी दिली.गेल्यावर्षी पहिल्या लाटेत या सोग्रस गावात एकही रुग्ण नव्हता, मात्र थोडे जरी नियम मोडले आणि दुर्लक्ष केले तर रुग्णसंख्या कशी वाढते याचा अनुभव दुसऱ्या लाटेत आला. दि. १६ मार्च रोजी एक रुग्ण आढळला व त्यांचा मृत्यू झाल्याने सर्वच गाव घाबरले. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीसपाटील, आरोग्य सेवक व ग्रामस्थांनी ही बाब हेरली आणि दि. १७ ते २७ मार्च या कालावधीत पूर्ण गाव बंद करून जनता कर्फ्यू पाळला.सर्व व्यावसायिकांची कोरोना तपासणी करून घेतली. गावात दर दिवसांनी जंतुनाशक फवारणी केली. गावात प्रत्येक कुटुंबाला सॅनिटायझर वाटप केले गेले. हात धुण्याचे प्रात्यक्षिक अनेक ठिकाणी घेण्यात आले. मास्क लावणे , सामाजिक अंतर ठेवणे, शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी केली. जे लोक नियम पाळत नव्हते त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.परिसरातील किराणा, हॉटेल, सर्व दुकाने यांना कोरोना विषाणूपासून सतर्क राहण्याच्या नोटिसा देण्यात आल्या. कोरोना कमिटीची स्थापना करून त्यांना विशेष अधिकार दिले. थर्मामीटर, थर्मल स्कॅनर व पल्स ऑक्सिमीटरच्या साहाय्याने घरोघरी जाऊन शिक्षक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व मदतनिसांमार्फत तपासणी केल्याने रुग्णसंख्या कमी होण्यात यश आले. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतHealthआरोग्य