शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

चाळकऱ्यांच्या मदतीला धावली सोसायटी

By admin | Updated: August 5, 2016 01:29 IST

भगूरकर चाळीतील पूरग्रस्तांना आश्रय : प्राउड आॅफ ‘शाकुंतल प्राईड’

नाशिक : गंगापूररोडवरील चैतन्यनगरातील भगूरकर चाळीत गेल्या वीस वर्षांपासून कष्टकरी वस्तीला. लगतच शाकुंतल प्राईड या सोसायटीची इमारत उभी राहिलेली. दररोज सोसायटीमधून चाळीतील कष्टकऱ्यांचे जीवन अनुभवणाऱ्या रहिवाशांनी मंगळवारी आलेल्या महापुराचा थरार ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवला आणि बघता-बघता तीन तासांच्या अवधीत कष्टकऱ्यांची चाळ पाण्याखाली गुडूप झाली. सैरभैर झालेल्या चाळीतील २२ कुटुंबांपुढे निवाऱ्याचा प्रश्न उभा राहिला आणि चाळकऱ्यांच्या मदतीला सोसायटी धावून आली. सोसायटीच्या पार्किंगचा परिसर खुला करून देण्यात आला आणि नास्ता-भोजनापासून कपडालत्तापर्यंत विस्थापित चाळकऱ्यांची सारी बडदास्त सोसायटीतील रहिवाशांनी ठेवली. दोन रात्र निवारा लाभल्यानंतर ज्यावेळी चाळकऱ्यांनी सोसायटीचा परिसर सोडला त्यावेळी प्रत्येकाच्या मुखातून ‘शाकुंतल प्राईड’बद्दल कृतज्ञतेचा स्वर निघाला. चैतन्यनगरातील गोंदवलेकर मंदिराजवळ गेल्या वीस वर्षांपासून भगूरकर चाळ व शिंदे चाळमध्ये कष्टकरी-श्रमजीवी वर्ग वस्तीला आहे. मंगळवारी (दि. २) धो-धो पाऊस कोसळायला सुरुवात झाल्यानंतर गोदावरीच्या महापुराचे पाणी वाढत जाऊन ते भगूरकर चाळीच्या अंगणात येऊन पोहोचले. धोक्याची चाहूल लागल्यानंतर चाळकऱ्यांनी जे हाती लागेल ते सोबत घेत बाहेर पळ काढला आणि अवघ्या तीन तासांत आख्खी भगूरकर चाळ पुराच्या पाण्याखाली गुडूप झाली. डोळ्यादेखत आपली घरे पाण्याखाली गेल्यानंतर चाळीतील २२ कुटुंबातील सुमारे ११० सदस्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. आता लेकरा-बाळांसह जायचे कुठे हा प्रश्न पुढे उभा राहिला. अखेर रोज आपल्या सोसायटीच्या खिडकीतून कष्टकऱ्यांचे जीवन अनुभवणाऱ्या ‘शाकुंतल प्राईड’ या सोसायटीतील रहिवाशांमधील मानवतेने साद घातली. नाट्यलेखक दत्ता पाटील व प्रतिभा पाटील या दाम्पत्याने पुढाकार घेतला आणि त्यांच्या सोबत आख्खी सोसायटी उभी राहिली. पार्किंगमधील परिसर मोकळा करून देत सर्व विस्थापितांना निवारा उपलब्ध करून दिला.