शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना पीककर्जासाठी सोसायट्या आग्रही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 18:19 IST

राज्य सरकारच्या महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेंतर्गत नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला शासनाने आठशे कोटी रुपयांचा निधी अदा केल्यामुळे बॅँकेच्या आर्थिक परिस्थितीला मोठा हातभार लागला असून, बॅँकेला प्राप्त झालेल्या या निधीतून गावोगावचे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा पीककर्ज देण्यात यावे, यासाठी विविध कार्यकारी सोसायट्या आग्रही झाल्या आहेत. यासंदर्भात त्यांनी एकत्र येत जिल्हा मध्यवर्ती बॅँकेवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे.

नाशिक : राज्य सरकारच्या महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेंतर्गत नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला शासनाने आठशे कोटी रुपयांचा निधी अदा केल्यामुळे बॅँकेच्या आर्थिक परिस्थितीला मोठा हातभार लागला असून, बॅँकेला प्राप्त झालेल्या या निधीतून गावोगावचे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा पीककर्ज देण्यात यावे, यासाठी विविध कार्यकारी सोसायट्या आग्रही झाल्या आहेत. यासंदर्भात त्यांनी एकत्र येत जिल्हा मध्यवर्ती बॅँकेवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे.यासंदर्भात विविध कार्यकारी सोसायट्यांच्या फेडरेशनची नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हा बॅँकेमार्फत शेतकºयांना कर्जपुरवठा करणाºया विविध कार्यकारी सोसायट्यादेखील जिल्हा बॅँकेच्या आर्थिक परिस्थितीमुळे गेल्या चार वर्षांपासून अडचणीत आल्या होत्या. आता मात्र शासनाने दोन लाख रुपये पीककर्ज थकबाकीदार असलेल्या शेतकºयांसाठी महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजना जाहीर केली व त्याचा लाभ जिल्ह्यातील लाखो शेतकºयांना मिळाला आहे. मात्र, त्यापेक्षा अधिक रकमेचे थकबाकीदार असलेल्या व नियमित कर्जफेड करणाºया शेतकºयांना जिल्हा बॅँकेकडून पीककर्ज दिले जात नाही. आता मात्र राज्य सरकारने जिल्हा बॅँकेने ज्या शेतकºयांचे कर्जमाफ केले, त्यापोटी सुमारे आठशे कोटी रुपयांचा निधी जिल्हा बॅँकेला उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे मिळालेल्या अनुदानातून जिल्हा बॅँकेने नियमित कर्जफेड करणाºया शेतकºयांना यंदा पीककर्जासाठी प्राधान्याने कर्जपुरवठा करावा, अशी भूमिका फेडरेशनने घेतली आहे. याबाबत जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांना निवेदन देण्यात आले असून, शेतकºयांना कर्जपुरवठा उपलब्ध करून दिल्यास सोसायट्यांना जीवदान तर मिळेलच; परंतु कोरोनाच्या काळात संकटात सापडलेल्या शेतकºयांना उभे राहण्यास मोठी मदत होणार असल्याचे म्हटले आहे. जिल्हा बॅँकेने लवकरात लवकर कर्जपुरवठा पूर्ववत करावा, अन्यथा फेडरेशनच्या वतीने शेतकºयांसाठी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा फेडरेशनचे नेते विष्णुपंत गायखे, राजू देसले, भाऊसाहेब गायकवाड, संजय गायधनी, संपतराव वक्ते, मनोहर देवरे, सोमनाथ गायकवाड यांनी दिला आहे.

 

 

टॅग्स :NashikनाशिकCrop Loanपीक कर्ज