शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

काळजीवाहक कर्मचारी कांबळे याच्या क्रुरतेने सारेच हादरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 18:25 IST

नाशिक : पाठीमागून लाथ मारल्याने जमीनिवर पडलेल्या विद्यार्थ्यास मारहाण झाल्याने तो विद्यार्थी वेदनेने विव्हळत असतांनाच दुसऱ्याला विद्यार्थ्याला पलंगावरून फेकून ...

ठळक मुद्देअंध विद्यार्थी मारहाण प्रकरण : सभापतींसमोर कथक केली आपबिती

नाशिक : पाठीमागून लाथ मारल्याने जमीनिवर पडलेल्या विद्यार्थ्यास मारहाण झाल्याने तो विद्यार्थी वेदनेने विव्हळत असतांनाच दुसऱ्याला विद्यार्थ्याला पलंगावरून फेकून दिल्याने तोही जखमी झाला. एव्हढ्यावरच तो कर्मचारी थांबला नाही तर त्याने एका विद्यार्थ्याच्या कानशिलात मारल्याने त्याच्या कानाचा पडदाच फाटला. लघुशंकेसाठी उभा असलेल्या एकाच्या पाठीत लाथ घालून त्यालाही जखमी करण्यात आले. कर्मचाºयाच्या क्रुुरततेबाबत पिडीत विद्यार्थ्यांनी अनेक घटना सांगितल्याने सभापतींसह सारेच हादरले.शासकीय अंध शाळेतील विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर बुधवारी समाजकल्याण सभापती सुनिता चारोस्कर यांना अंध शाळेतील त्या पिडीत विद्यार्थ्यांची भेट घेतली असता अंध विद्यार्थ्यांवरील आत्याचाराचा गंभीर प्रकार अधिक समोर आला. यावेळी सभापती चोरोस्कर यांनी पिडीत विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर कांबळे यांच्या क्रुरतेचे अनेक प्रकरणे समोर आले. येथील शासकीय अंध शाळेत एकुण ३५ निवासी विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांची काळजी घेण्यासाठी काळजीवाहक कर्मचारी संदीप कांबळे याची नेमणूक करण्यात आलेली आहे.मात्र काळजीवाहकानेच या विद्यार्थ्यांना आमानुष मारहाण केल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्या पुढे आला आहे. यावेळी सुदाम पावसे या विद्यार्थ्याने घडलेल्या प्रकरणाची माहिती सभापतींना दिली. या मारहाणतीत पावसे याच्या डोक्याला बॅट लागल्याने तो जखमी झाला आहे. सागर मुरकुटे याच्या कानाशिलात लगावल्याने त्याच्या कानाचा पडदा फाटल्याने त्याला ऐकू येत नसून त्याचे पालक त्याला घरी घेऊन गेले आहेत. यावेळी येथे उपस्थित सर्वच विद्यार्थ्यांनी कांबळे याच्या दहशतीचे किस्से सांगितले.कांबळे यांने वारंवार विद्यार्थ्यांना लघुशंका कारतांना लाथा मारणे, पलंगावरून फेकून देणे, रोज दारू पिऊन धिंगाणा घालणे, संगणकावर पिक्चर पाहत बसणे, जातीवाचक शिवीगाळ करणे आदि गंभीर आरोप विद्यार्थांनी केले आहेत. विशेष म्हणजे हा सारा प्रकार विद्यार्थी सांगत असतांना अंधशाळेच्या अधिक्षक वाझट यांंनी मात्र आपणास याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले. वाझट या शासकीय निवासस्थानी न राहाता मुंबईनाका येथे राहत असल्याचेही समोर आले. याप्रकरणी सुनीता चारोस्कर यांनी संबंधित कर्मचाºयाला तत्काळ बडतर्फ करण्याची सुचना केली आहे. याप्रकरणी स्वता: लक्ष घालून संबंधितावर कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य ज्योती जाधवही उपस्थित होत्या. 

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद