शहरं
Join us  
Trending Stories
1
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
4
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
5
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
6
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
7
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
8
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
9
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
10
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
12
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
13
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
14
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
15
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
16
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
17
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
18
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
19
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी
20
शालार्थ आयडी घोटाळा : छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या सचिव वैशाली जामदार यांना अटक

समाजवादी नेते निहाल अहमद निवर्तले

By admin | Updated: March 1, 2016 00:12 IST

चळवळीतील झुंझार ‘साथी’ हरपला : शासकीय मानवंदना देऊन दफनविधी

मालेगाव : येथील ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी मंत्री साथी निहाल अहमद मौलवी मोहंमद उस्मान (९०) यांचे सोमवारी (दि.२९) सकाळी पावणेसात वाजता नाशिक येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. रात्री उशिरा बडा कब्रस्थान येथे शासकीय मानवंदना देऊन त्यांचा दफनविधी करण्यात आला.काही महिन्यापासून निहाल अहमद यांची प्रकृती खालावली होेती. रविवारी त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने मालेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ते उपचारास प्रतिसाद देत नसल्याने त्यांना नाशिक येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच शहरावर शोककळा पसरली. कार्यकर्त्यांनी त्यांच्या हजारखोली येथील निवासस्थानी धाव घेतली.खासदार सुभाष भामरे, राज्यमंत्री दादा भुसे, रोहिदास पाटील, आमदार पंकज भुजबळ, कपिल पाटील, आसीफ शेख रशीद, माजी आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल, उपमहापौर युनूस इसा, शमशेरखान पठाण, गुलाबराव पाटील, अपर पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. निहाल अहमद यांचे पार्थिव दुपारी समाजवादी नेते निहाल अहमद निवर्तलेचळवळीतील झुंझार ‘साथी’ हरपला : शासकीय मानवंदना देऊन दफनविधीपावणेतीन वाजता त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. त्यांच्या निधनामुळे शहरातील सर्व व्यवहार बंद होते. रात्री ९ वाजता त्यांचे जनाजा (अंत्ययात्रा) काढण्यात आला. शासकीय मानवंदना देत बडा कब्रस्तान येथे दफनविधी पार पडला. निहाल अहमद यांनी १९६७ मध्ये प्रजा समाजवादी पक्षाच्या तिकिटावर पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवून विजयश्री संपादन केली होती. त्यानंतर १९७२चा अपवादवगळता १९७८ ते १९९५ पर्यंत त्यांनी आमदारकी भूषविली होती. राज्यातील पुलोदच्या सरकारमध्ये त्यांनी तंत्र व उच्चशिक्षण तथा रोजगार हमी योजना मंत्री म्हणून कामकाज पाहिले होते. १९८६ ते ९० दरम्यान विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी भूमिका बजावली. मालेगाव महापालिका अस्तित्वात आल्यानंतर २००२ मध्ये प्रथम महापौर होण्याचा मानही त्यांना मिळाला होता. राजकीय जीवनातील वादळी तसेच अनोखे निर्णय घेणारे व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख होती. चळवळीतील झुंझार नेता, उत्कृष्ट वक्ता, तत्त्वनिष्ठ राजकारणी म्हणून त्यांची ख्याती होती. गोरगरीब, शोषित, दलित, मुस्लीम व कामगारांच्या प्रश्नांसाठी ते आयुष्यभर झटत राहिले. केवळ आमदारकीच नव्हे; तर राज्यमंत्रीपदावर असतानाही त्यांनी कधी बडेजाव मिरविला नव्हता. नेहमी सायकलीवर फिरणारे हे आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व जनसामान्यात ‘सायकलवाला आमदार’ म्हणून परिचित होते. त्यांच्या पश्चात दोन पत्नी, पाच मुले, तीन मुली, जावई, सुना व नातवंडे असा परिवार आहे. (प्रतिनिधी)