शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सामाजिक कार्यकर्त्या अनिता पगारे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:10 IST

कष्टकरी, सोशित, आणि स्त्रीमुक्तीच्या चळवळीच्या सक्रीय कार्यकर्त्या असलेल्या अनिता पगारे यांनी महिलांसह युवा वर्गासाठी विविधप्रकारे सामाजिक कार्य केले ...

कष्टकरी, सोशित, आणि स्त्रीमुक्तीच्या चळवळीच्या सक्रीय कार्यकर्त्या असलेल्या अनिता पगारे यांनी महिलांसह युवा वर्गासाठी विविधप्रकारे सामाजिक कार्य केले आहे. त्यांनी कला शाखेतून राज्यशास्त्र विषयात पदवी मिळविली होती. तसेच मास्टर इन सोशल वर्क-फॅमिली चाईल्ड वेल्फेअर (एमएसडब्ल्यू) चीही पदवी त्यांनी घेतली होती. १९९०-९९ साली पगारे या नाशिकमध्ये महिला हक्क संरक्षण समितीवर कार्यरत होत्या. कौटुंबिक समुपदेशक व सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांनी यावेळी महिलांच्या न्यायहक्कासाठी लढा दिला होता.

२०१९ साली त्यांनी कम्युनिटी डेव्हलपमेंट मोखाडा-जव्हार ब्लॉक हा प्रोजेक्ट राबविला होता. या प्रकल्पासाठी त्यांना ‘ओरेहन’ संस्थेच्या वतीने जबाबदारी सोपविण्यात आली होती. या प्रकल्पाच्या त्यांनी व्यवस्थापक म्हणून काम बघितले होते. यानंतर अल्पवयीन मुले, तरुण, पदव्युत्तर पदवी घेणारे विद्यार्थी यांच्या समुपदेशनासाठी त्यांनी विविध उपक्रमही राबिवले. २०१५-२०१६साली विश्वास ज्ञान प्रबोधिनी व रिसर्च सेंटरच्या वतीने समन्वयक म्हणून पगारे यांनी युवकांसाठी कार्य केले. तत्पुर्वी २००६-२००८साली पगारे यांनी राज्य सरकारच्या महिला व बालकांच्या विशेष सेलमध्ये समन्वयक म्हणून काम केले होते. २००१-२००२ साली रेशनिंग कृती समितीच्या संशोधन प्रकल्पामध्येही पगारे यांचा सहभाग होता.

पगारे यांना १९९८साली यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई,च्या वतीने नवभारत युवा आंदोलनांतर्गत त्यांना राज्यस्तरीय ‘युवा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले होते. नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण अकादमीमध्ये त्यांनी महिलांविषयक कायदे या विषयावर व्याख्याता म्हणून प्रशिक्षणार्थीं पोलीसांना धडे दिले. त्यांच्या अचानकपणे झालेल्या निधनाने शहर व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

===Photopath===

280321\28nsk_20_28032021_13.jpg

===Caption===

 अनिता पगारे