शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक शक्ती इतिहासनिर्मिती करते रावसाहेब कसबे : वादळाचे शिलेदार पुस्तकाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 00:50 IST

नाशिक : सामाजिक शक्ती उभी करण्याचे काम महापुरुष करीत असतात. अशा महापुरुषांच्या पाठीशी उभी राहणारी सामाजिक शक्ती ही इतिहासाची निर्मिती करते. हीच सामाजिक शक्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशीही उभी राहिल्याने बाबासाहेब इतिहासाचे निर्माते झाल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा विचावंत रावसाहेब कसबे यांनी केले आहे.

नाशिक : सामाजिक शक्ती उभी करण्याचे काम महापुरुष करीत असतात. अशा महापुरुषांच्या पाठीशी उभी राहणारी सामाजिक शक्ती ही इतिहासाची निर्मिती करते. हीच सामाजिक शक्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशीही उभी राहिल्याने बाबासाहेब इतिहासाचे निर्माते झाल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा विचावंत रावसाहेब कसबे यांनी केले आहे.परिवर्तन परिवार बहुद्देशीय संस्थेतर्फे शुक्रवारी (दि.२५) रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयात प्रा. गंगाधर अहिरे लिखित ह्यवादळाचे शिलेदारह्ण या व्यक्तिचित्रण ग्रंथाचे ज्येष्ठ समीक्षक डॉ. ऋषिकेश कांबळे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते करुणासागर पगारे, भाषा अभ्यासक देवेंद्र उबाळे, प्रा. साधना देशमुख, प्रतिभा अहिरे आदी उपस्थित होते. रावसाहेब कसबे म्हणाले, जो महापुरुष वर्तमानकाळात हस्तक्षेप करतो, त्याचा इतिहास होतो. अशा महापुरुषांच्या चळवळीतील त्यांचे अनुयायी इतिहासाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देत असतात. धुरिणांचा जीवनलेख लेखकाने शब्दबध्द केला असून इतिहासकार आणि संशोधकांपुढे या पुस्तकाने एक आव्हान निर्माण केल्याचे त्यांनी नमूद केले. तर हा ग्रंथ म्हणजे निवडक प्रतिक्रांतिवाद्यांना थोपविणाऱ्या क्रांतिवाद्यांची शौर्यगाथा असल्याचे डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी अधोरेखित केले. इतिहास कसा घडतो हे जाणून घेण्यासाठी सामान्य धुरिणांची साधारचरित्रांचा व व्यक्तिचित्रणांचा अभ्यासकांना उपयोग होत असतो. त्यासंदर्भाने विविध विचारवंताचे दाखले देऊन, सामान्य कार्यकर्त्याचा इतिहास घडविण्यातील योगदान ग्रंथांच्या केंद्रस्थानी असल्याचे निरीक्षण देवेंद्र उबाळे यांनी नोंदविले. दरम्यान, प्रा. गंगाधर अहिरे यांनी ग्रंथनिर्मितीमागील भूमिका मांडतानाच आगामी काळात अनेक अलक्षित धुरिणांचा इतिहास संशोधनाच्या बाण्याने शब्दबध्द करण्याचा मनोदय व्यक्त केला. प्रास्ताविक करुणासागर पगारे यांनी केले. सूत्रसंचालन रोहित गांगुर्डे व नितीन भुजबळ यांनी केले. डॉ. धीरज झाल्टे यांनी आभार मानले. यावेळी .परिवर्त परिवाराचे नीतीन बागूल, किशोर शिंदे, वैशाली रणदिवे, कवी काशीनाथ वेलदोडे, राजेद्र मोकळ, महेंद्र रणदिवे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक