शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

सामाजिक संदेश देणाऱ्या डायरींना पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 00:18 IST

आजच्या आधुनिक डिजिटल युगातही डायरीचे महत्त्व कायम असून, नवीन वर्षापासून हिशेबासह विविध प्रकारच्या कामांसाठी डायरी व्यापारी व ग्राहकांना लागतात.

नाशिक : आजच्या आधुनिक डिजिटल युगातही डायरीचे महत्त्व कायम असून, नवीन वर्षापासून हिशेबासह विविध प्रकारच्या कामांसाठी डायरी व्यापारी व ग्राहकांना लागतात. नवीन वर्ष अवघ्या आठ दिवसांवर आल्यामुळे वर्षभराच्या नियोजनासाठी लागणाºया २०१९च्या नवीन वर्षाच्या डायºया बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत.  शहरातील मेनरोडवरील विविध दुकानांपुढे डायरींचे स्टॉल मांडलेले दिसून येत आहेत. तसेच स्टेशनरी, गिफ्ट शॉपी अशा विविध दुकानांमध्ये डायरी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसत आहे. आजच्या आधुनिक युगात संगणक, मोबाइल, टॅब, लपटॉप ही माहिती साठवण्यासाठी असलेली आधुनिक यंत्रे उपलब्ध असले तरीदेखील लोकांनी डायरीचा वापर करणे सोडलेले नाही.आज आधुनिक यंत्रे उपलब्ध असतानादेखील अनेक कंपन्या, सरकारी आणि खासगी कार्यालय, उद्योजक, व्यापारी, लेखक, पत्रकार, शिक्षक, विद्यार्थी, गृहिणी आणि वृद्ध आदी नागरिक आपल्या रोजच्या नियोजन व दैनंदिन व्यवहाराची नोंद ठेवण्यासाठी डायरीचा उपयोग करतात, तर काही नवीन वर्षाचे संकल्प लिहिण्यासाठी डायरीचा उपयोग करीत असल्यामुळे आजच्या डिजिटल युगातही डायरीचे महत्त्व कायम आहे.सध्या बाजारपेठेत २०१९ या नवीन वर्षाच्या डायरी विक्रीसाठी दाखल झाल्या असून, त्यामध्ये विविध प्रकार आहेत. पॉकेट डायरी, न्यू इयर डायरी, इंजिनिअरिंग डायरी, आॅर्गोनायझर डायरी, एक्झिक्युटिव्ह डायरी, प्लॅनर डायरी, स्पायरल डायरी, लेदर डायरी, दिनविशेष डायरी, कार्पोरेट डायरी, कार्डबोर्ड डायरी, टेलिफोन डायरी, संतांची महती सांगणारी डायरी, लॉक डायरी, दैनंदिनी लिहिण्यासाठी डायरी आदी प्रकारच्या डायºया विक्रीसाठी बाजारपेठेत उपलब्ध असून, डायरींची किंमत दहा रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत आहेत.डायरींमध्ये अनेक व्यक्तींनी केलेल्या कामगिरीची माहिती देण्यात आली आहे. छायाचित्र आणि त्यांनी केलेल्या कार्याची माहितीदेखील आहे. याचबरोबर सामाजिक आणि पर्यावरणविषयक सामाजिक संदेश देण्यात आले आहेत. स्त्रीभ्रूण हत्येमुळे दिवसेंदिवस मुलींच्या जन्माचे प्रमाण घटत आहे. आम्हाला माहीत आहे, तरी आपण मुलींची हत्या का करीत आहोत. झाडे तोडून पर्यावरणाची हानी होत आहे. तरी आपण का झाडे तोडत आहोत? अशा प्रकारचे सामाजिक प्रश्न उपस्थित करून डायरींच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.बºयाचदा नवीन वर्षाची भेटवस्तू म्हणून डायरी दिली जाते. आकार, डिझाइन, रंग, पानावरची रचना, मजकूर याचा विचार करून भेटवस्तू देण्यासाठी खास आकर्षक डायरी बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. तसेच विशिष्ट विषयासंदर्भात मजकूर, सुविचार असलेल्या डायºयाही भेटवस्तू म्हणून दिल्या जातात.वर्षभर डायरींना मागणी असते, पण नववर्षानिमित्त खास आकर्षक डायरींना मागणी असते. यातही कार्डबोर्ड, कार्पोरेट डायरींचा खप अधिक असतो. भेटवस्तू देण्यासाठीसुद्धा डायरींचा उपयोग होतो. त्यामुळे विशिष्ट मजकूर, डिझाइन असलेल्या डायरींनाही विशेष मागणी असते. - सुनीता सावंत, विक्रेतानवीन वर्ष काही दिवसांवर आल्यामुळे अनेक कंपन्या, नागरिक आपल्या रोजच्या दैनंदिन व्यवहार नोंदीसाठी डायरीचा उपयोग करीत असतात. यामुळे २०१९ या नवीन वर्षाच्या डायरींची खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहेत. यंदाच्या वर्षी काही डायरींमध्ये बेटी बचाव... बेटी पढाव... सामाजिक संदेश आणि पर्यावरणाविषयी संदेशदेखील देण्यात आले आहेत. अशा डायरींना नागरिक अधिक पसंती देत आहेत.  - संजय बागुल, विक्रेतानवीन वर्षाचे संकल्प लिहिण्यासाठी आणि रोजची दैनंदिनी व हिशोब लिहिण्यासाठी आम्ही यंदा नवीन डिझाइनच्या डायरींची खरेदी करत आहोत.  - गौरी जोशी, ग्राहक

टॅग्स :New Yearनववर्षNashikनाशिक