नाशिक : महिलांचे ढोल पथक, विविध राष्ट्रीय नेत्यांच्या वेशभूषेत आलेली बालके, बेटी बचाव अभियानासह ‘हरित नाशिक, हरित भारत’, ‘कृत्रिम अवयव प्रत्यारोपण, गो-सेवा यांसारख्या सामाजिक विषयांवर आधारित प्रदर्शनाचे रथ लक्षवेधी ठरले. या माध्यमातून स्वातंत्र्यदिनी शहरात जनजागृती करण्याचा प्रयत्न करत सामाजिक संदेश दिला.निमित्त होते, स्वराज प्रतिष्ठान व मारवाडी युवामंचाच्या वतीने आयोजित एकात्मता शोभायात्रेचे. सकाळी साडेनऊ वाजता डोंगरे वसतिगृह मैदानावरून शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार देवयानी फरांदे, उपमहापौर गुरुमित बग्गा, उद्योजक अशोक कटारिया, नेमिचंद पोद्दार, व्ही. एन. नाईक संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी आव्हाड, अॅड. नंदकिशोर भुतडा, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शहा, ललित बूब, कार्याध्यक्ष अॅड. आकाश छाजेड, नीलेश भंडारी, अमित बोरा, प्रितिश छाजेड, सुमित बोरा, महेंद्र पोद्दार आदि मान्यवर उपस्थित होते. त्याचप्रमाणे विविध देशभक्तिपर गीतांनी परिसर दुमदुमून गेला होता.साक्षी गणपती महिला ढोल पथक पारंपरिक मराठमोळ्यात पोषाखात शोभायात्रेत सहभागी झाले होते. नूतन विनय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लेजीमनृत्य सादर केले. सॅवी महाविद्यालय, शरण सामाजिक संस्था, जैन सोशल ग्रुप प्लॅटिनम, अग्रवाल सखी मंच, लक्ष्मीनारायण महिला मंडळ, अर्पण रक्तपेढी, माहेश्वरी युवक मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
एकात्मता यात्रेतून सामाजिक संदेश
By admin | Updated: August 17, 2015 23:33 IST