शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

बॅँकांमध्येही आता सोशल डिस्टन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 00:16 IST

संचारबंदीच्या कालावधीत बॅँकेत गर्दी वाढत आहे. मात्र, अशावेळी कोणत्याही प्रकारचा संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेता महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी ग्राहकांसाठी ठराविक ठिकाणी जागा आखून सोशल डिस्टन्स ठेवण्याची सक्ती केली आहे.

ठळक मुद्देमनपाची नियमावली : एटीएममध्ये सॅनिटायझर सक्तीचे

नाशिक : संचारबंदीच्या कालावधीत बॅँकेत गर्दी वाढत आहे. मात्र, अशावेळी कोणत्याही प्रकारचा संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेता महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी ग्राहकांसाठी ठराविक ठिकाणी जागा आखून सोशल डिस्टन्स ठेवण्याची सक्ती केली आहे. यासंदर्भात त्यांनी बॅँकांसाठी नियमावलीच तयार केली असून, त्यात अनेक प्रकारच्या स्वच्छता सेवा सक्तीच्या केल्या आहेत.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने अनेक प्रकारचे उपाय केले असून, सध्या नाशिक जिल्ह्णात संचारबंदी सुरू आहे. मात्र अत्यावश्यक सेवा सुरू असून, त्यात किराणा दुकाने, औषधालये, बॅँका आणि पेट्रोलपंपांचा समावेश आहे. बॅँकांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतंत्र निर्बंध लागू केले असून, त्याअंतर्गत एकावेळी बॅँकेत चार ते पाच ग्राहकांनाच प्रवेश द्यावा तसेच काउंटरसमोरदेखील ठराविक अंतरातच ग्राहक राहतील, असे निर्देश आहेत. मात्र, त्यानंतरदेखील अनेक बॅँका आणि एटीएम सेवा देताना काळजी घेत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी बॅँकेसाठी नियमावलीच तयार केली आहे.ज्या बँक व एटीएममध्ये जास्त गर्दी होते अशा बँकांनी बँकेबाहेर गर्दी नियंत्रणासाठी बँकेच्या व्यवस्थापनाने पुरेसे कर्मचारी नियुक्त करावेत. तसेच या नियोजनानुसार बँकांनी कामाचे तास व वेळ याबाबत नियोजन करावे. तसेच आपत्कालीन परिस्थिती असल्यामुळे उलटपक्षी त्यांनी जास्तीत जास्त वेळ बँक एटीएम उघडे ठेवून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे नियमच आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले आहेत.बँका आणि एटीएममध्ये सोशल डिस्टन्स ठेवणे सक्तीचे करण्यात आले आहे. सर्व बँकांनी आपल्या बँकांचा व एटीएमच्या दर्शनी भागावर दूरध्वनी आणि भ्रमणध्वनी क्र मांक व व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक ठळक जागी लावावेत. तसेच प्रत्येक ग्राहक किमान पाच फुटांचे सामासिक अंतर ठेवून बँक व एटीएममध्ये व बाहेर मार्किंग करावे. बँक एटीएमसाठी असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना हँडग्लोज वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbankबँक