शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

व्हायरल व्हिडीओवरून नागाचा छळ करणारा ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 23:34 IST

नागाला पकडून त्याच्या डोक्यावर काठीने फटके मारून आणि त्याने फणा उगारल्यानंतर त्याचे दात नेलकटरने कापल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वनविभागाने त्याचा शोध घेत निफाड तालुक्यातील खेडे येथील शिवाजी श्रीपत साबळे या संशयितास ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सायखेडा : नागाला पकडून त्याच्या डोक्यावर काठीने फटके मारून आणि त्याने फणा उगारल्यानंतर त्याचे दात नेलकटरने कापल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वनविभागाने त्याचा शोध घेत निफाड तालुक्यातील खेडे येथील शिवाजी श्रीपत साबळे या संशयितास ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.एकाने नागाला पकडून त्याच्या डोक्यावर काठीने फटके मारत आणि फणा उभारताच त्याच्या दातांना नेलकटरने कट करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सदर माहिती वनविभागाला मिळताच या व्यक्तीचा शोध सुरू करण्यात आला. यामध्ये व्हिडीओतील व्यक्ती ही निफाड तालुक्यातील खेडे येथील असल्याचे आढळून आले. त्यानुसार, वनविभागाच्या पथकाने खेडे येथे जाऊन सदर इसम शिवाजी श्रीपत साबळे याच्या घरावर छापा टाकला आणि त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी साबळे यास न्यायालयात उभे केले असता, त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या मोहिमेत वनक्षेत्र अधिकारी संजय भंडारे, जी. बी. वाघ, एम. बी. पवार, नागपुरे, बिन्नर यांनी विशेष भूमिका पार पाडली. मिळालेल्या माहितीनुसार, साबळे याने उगाव येथे सकाळी गावात असताना एका नागाला पकडले. नागाने फणा उभारताच दातांना नेलकटरच्या सहाय्याने कट करण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :Nashikनाशिकsnakeसाप