येवला : श्री गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्वामी मुक्तानंद विद्यालयाची विज्ञान शाखेत स्नेहल भास्कर सैंदर हीने ८८.०६ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम आली. चोपदार शगुप्ता गनीसाब ८७.२३ टक्के गुण मिळवून दुसरी आली. वाणिज्य शाखेत ८३.३० टक्के गुण मिळवून पौर्णिमा किरण, सावित्री साठे ८१.८४ टक्के गुण, जयश्री माळोकर ८१.५३ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. कला शाखेत अंकिता खैरे ७९.३३ टक्के, सुजाता उळेकर ७६.४६, कांचन सोनवणे ७४.३० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. किमान कौश्ल्य विभागाचा निकाल १०० टक्के लागला असून, शीतल साळवे ८२.९२ टक्के, सोनाली त्रिभुवन ७३.५३ हे प्रथम, द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष शरद नागडेकर, सेक्रेटरी दीपक गायकवाड, प्राचार्य एस. वाय. भड, उपप्राचार्य सी. ए. दुकळे यांचेसह अनेकांनी अभिनंदन केले आहे. (वार्ताहर)
बारावी परीक्षेत स्नेहल सैंदर स्वामी मुक्तानंद शाळेत प्रथम
By admin | Updated: June 3, 2014 01:42 IST