शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या गळ्यातील दोन मंगळसूत्रे हिसकावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2021 01:17 IST

जेवणानंतर शतपावली करत घरी परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील प्रत्येकी १८ व ४० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी येत हिसकावून पळ काढल्याची घटना सोमवारी (दि. ११) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुभम पार्क परिसरात घडली.

ठळक मुद्देसिडकोत चार दिवसांत दुसरी घटना : दोन लाख ३२ हजारांचे दागिने लुटले

सिडको : जेवणानंतर शतपावली करत घरी परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील प्रत्येकी १८ व ४० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी येत हिसकावून पळ काढल्याची घटना सोमवारी (दि. ११) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुभम पार्क परिसरात घडली. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार दिवसांत ही दुसरी घटना घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

सिडको परिसरातील कामटवाडे येथे राहणाऱ्या संगीता अतुल बोरटक्के (४१ , रा. संगीता पार्क) या सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास जेवण करून फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर आल्या होत्या. शुभम पार्कच्या दिशेने त्या पायी जात पुन्हा घराकडे परत येत होत्या. यावेळी अचानक त्यांच्या समोरून भरधाव वेगात एक दुचाकीस्वार त्यांच्याजवळ आला आणि त्याने काही समजण्याच्या आतच महिलेच्या गळ्यातील ७२ हजार रुपये किमतीचे १८ ग्रॅम वजनाचे एक व एक लाख ६० हजार रुपये किमतीचे मोठे पेंडल असलेले ४० ग्रॅम वजनाचे एक असे एकूण दोन लाख ३२ हजार रुपयांचे दोन मंगळसूत्रे बळजबरीने खेचून धूम ठोकली. बोरटक्के यांनी आरडाओरड करत लोकांना मदतीसाठी बोलविण्यापर्यंत दुचाकीस्वार सोनसाखळी चोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला होता. बोरटक्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयChain Snatchingसोनसाखळी चोरी