शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

साकोरा येथे सर्पदंशाने युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 01:59 IST

नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे सर्पदंशाने एका युवकाचा आज दुपारी मृत्यू झाल्याची घटना घडली. रवींद्र रघुनाथ मोरे (३५) असे त्याचे नाव आहे.

साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे सर्पदंशाने एका युवकाचा आज दुपारी मृत्यू झाल्याची घटना घडली. रवींद्र रघुनाथ मोरे (३५) असे त्याचे नाव आहे. अर्जुन सुलाने यांच्या घरात सकाळी नागीण निघाल्याची वार्ता कळताच रवींद्र त्यांच्या घरात गेला. शर्तीचे प्रयत्प करून त्याने  नागीणला पकडले. त्यानंतर दुपारी शेळ्या चारण्यासाठी संबंधित ठिकाणाहून काही अंतरावर नामदेव बोरसे यांच्या शेताजवळील नाल्यात गेला. रवींद्रला तेथेही एक नाग दिसल्याने त्याला पकडण्यासाठी तो धावला; परंतु प्रसंगावधान न बाळगल्याने त्या नागाने त्याच्या हाताला दोन ठिकाणी दंश केले. त्यानंतर रवींद्र थोडा अत्यवस्थ झाला. अशा अवस्थेत तो जवळच असलेल्या पेडकाई माता माध्यमिक विद्यालयात आला व तेथे पाण्याच्या टाकीवर पाणी पिऊन हात धुतला. तेवढ्यात मुख्याध्यापक योगेश पाटील तसेच काही शिक्षकांच्या लक्षात ही गोष्ट लक्षात आली. शिपाई भारत बोरसे यांनी त्याच्या हातावर ब्लेड मारण्याचा प्रयत्न केला. परंतु रवींद्रने नकार दिला. नंतर त्याच्या हाताच्या मागील बाजूस दोरी बांधून एका शिक्षकांसह ग्रामीण रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र परिस्थिती गंभीर असल्याचे पाहून त्याला मालेगाव येथे हलविण्यात आले. तेथेच त्याची प्राणज्योत मालवली. सोमवारी सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रवींद्र यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

टॅग्स :Deathमृत्यू