शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

मांडुळ तस्कराला गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 16:47 IST

पोलिसांनी खाकीचा हिसका दाखविताच त्याने गोणी खोलून दाखविले असता त्यामध्ये एका मांडूळ जातीचा जीवंत सर्प आढळून आला. पथकाने पंचांसमक्ष पंचनामा करत मांडुळ जप्त केले तसेच त्यास बेड्या ठोकल्या.

ठळक मुद्देपथकाने पंचांसमक्ष पंचनामा करत मांडुळ जप्त केले

नाशिक : मांडुळ या सर्पाची तस्करी करण्यासाठी एका मांडुळाला आपल्या घरात डांबून ठेवणाऱ्या तस्कराला मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या. त्याच्या घरातुन पुर्ण वाढ झालेले एक मांडूळ वन्यजीव जप्त करण्यास पोलिसांना यश आले आहे.याबाबत अधिक माहिती अशी, तपोवन रस्त्यावर एका मॉलच्या जवळ सर्प तस्कर मांडुळ जातीचा सर्प घेऊन विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त बातमी गुन्हे शाखेचे उपनिरिक्षक महेश शिंदे यांना मिळाली. त्यांनी याबाबत तत्काळ वरिष्ठ पालीस निरिक्षक डॉ. सिताराम कोल्हे यांना कळविले. त्यांच्या आदेशान्वये पथकाने या ठिकाणी सापळा रचला. संशयित सर्प तस्कर रमेश वसंत लकारे (२५,रा.इंदिरा घरकुल, करंजवन, ता.दिंडोरी) हा संशयास्पदरित्या बॅग घेऊन आला. यावेळी पथकाने शिताफीने रमेशला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देत स्वत:जवळ असलेल्या एका प्लॅस्टिकची गोणीची झडती घेण्यास नकार दिला. पोलिसांनी खाकीचा हिसका दाखविताच त्याने गोणी खोलून दाखविले असता त्यामध्ये एका मांडूळ जातीचा जीवंत सर्प आढळून आला. पथकाने पंचांसमक्ष पंचनामा करत मांडुळ जप्त केले तसेच त्यास बेड्या ठोकल्या. पोलिसांच्या पथकाने पुढील कारवाईसाठी वन्यजीव तस्कर रमेश व त्याच्याजवळ आढळून आलेला सर्प नाशिक पश्चिम वनविभागाकडे सोपविला आहे. वनपरिक्षेत्रअधिकारी विवेक भदाणे हे याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयwildlifeवन्यजीवforest departmentवनविभागArrestअटकsnakeसाप