शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जीवनावश्यक वस्तूंचा सुरळीत पुरवठा:निकम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 23:25 IST

मालेगाव : शहरात जीवनावश्यक वस्तूंची व रमजान काळात फळांची कमतरता होणार नाही, असे नियोजन महसूल विभागाकडून करण्यात आल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांनी दिली.

मालेगाव : शहरात जीवनावश्यक वस्तूंची व रमजान काळात फळांची कमतरता होणार नाही, असे नियोजन महसूल विभागाकडून करण्यात आल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांनी दिली.महापालिका, पोलीस यंत्रणेत महसूल विभागाने समन्वय घडवून आणत शहरात भाजीपाला, दूध, फळे व इतर सुविधा पुरविण्यासाठी नियोजन केले आहे. प्रतिबंधित क्षेत्रात जीवनावश्यक वस्तू पोहचविल्या जात आहेत. यासाठी व्हॅलेंटरची नेमणूक करण्यात आली आहे. घटना व्यवस्थापक डॉ. पंकज आशिया, अपर जिल्हाधिकारी निकम, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, तहसीलदार चंद्रजित राजपूत, शिवकुमार आवळकंठे आदी अधिकारी शहरातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.कोरोनाबाधित रुग्णालय परिसरातील सोयीसुविधा व तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या आहेत. महसूल विभागाकडून शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.  संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. काही पेट्रोलपंप सुरू करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सोयीसुविधा पुरविणाऱ्यांना पासेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. भाजीपाल्याच्या होलसेल व्यापाºयांसाठी तीन ठिकाणी भाजीमार्केट सुरू करण्यात आले आहेत.  शहरालगतच्या दाभाडीरोड, चंदनपुरीगेट येथे भाजीपाला विक्री केंद्र तर स्टार हॉटेल येथे फळ विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. होलसेल व्यापारी महापालिकेने ठरवून दिलेल्या दहा किरकोळ विक्री केंद्रावर भाजीपाला व फळे विक्री करीत आहेत. किराणा मालासाठी शहरात सहा डिलर्सची नेमणूक करण्यात आली आहे. या डिलर्सच्या माध्यमातुन किराणा माल विक्री केला जात आहे. दूधाचा सुरळीत पुरवठा केला जात आहे. याबरोबरच महसुल विभागाकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक