शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

गोदाकाठी धुक्याची दुलई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 14:42 IST

पारा ६.५ अंशांवर : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी थंडीचा निच्चांक सायखेडा : नवीन वर्षाच्या पहिल्याच पहाटे गोदाकाठसह निफाड तालुक्यात धुक्याने आपली झालर पसरून जणूकाही स्वागतच केले. थंडीने यंदाचा निच्चांक गाठला असून गोदाकाठ भागात ६.५ अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली आहे.

सायखेडा : नवीन वर्षाच्या पहिल्याच पहाटे गोदाकाठसह निफाड तालुक्यात धुक्याने आपली झालर पसरून जणूकाही स्वागतच केले. थंडीने यंदाचा निच्चांक गाठला असून गोदाकाठ भागात ६.५ अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली आहे. पिकांना थंडी अनुकूल असली तरी धुके मात्र शेती पिकांना नुकसानकारक ठरत आहे.काही दिवसांपासून ढगाळ हवामान गेल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे. थंडीत वाढ झाली आहे. यापुढे काही दिवस थंडी वाढत राहून 0 अंशावर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान खात्याने थंडीत वाढ होणार असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार राज्यात महाबळेश्वर नंतर सर्वाधिक थंडी निफाड तालुक्यात असते. त्यामुळे येथे मागील वर्षी ज्या प्रमाणे दवं गोठले, हिमकन तयार होऊन झालर पसरली त्याप्रमाणे पुढील आठवड्यात पुन्हा एकदा ती वेळ येणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.थंडीचा परिणाम हा सर्वाधिक प्राण्यांना बसतो. शेतात, नदीच्या काठावर वास्तव्यास असणारे विविध प्राणी आणि शेतकऱ्यांच्या घरी असणारे पाळीव प्राणी यांना थंडीचा फटका बसतो. मानवी जनजीवन विस्कळीत होते. सकाळी अकरा वाजेपर्यंत माणूस घरातून बाहेर पडत नाही, त्यामुळे कामे रखडतात आणि रात्री इतक्या थंडीत शेतात पिकांना पाणी देऊ शकत नाही. त्यामुळे थंडी अनुकूल असली तरी तितक्याच प्रमानात डोकेदुखी ठरते.------------------शेतकरी धास्तावलेकांदे, गहू हरबरा या रब्बी हंगामातील पिकांना थंडी अनुकूल असते. पिकांवर रोग येत नाही. पिके जोमाने वाढतात, मात्र धुक्याने पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून होतो. पीकाचे शेंडे करपू लागतात, मोठ्या प्रमाणावर वाढ थांबते. द्राक्ष पीकाला फटका बसतो फुगवण थांबते, भुरी नियंत्रणासाठी शेतकर्यांना कसरत करावी लागते महागड्या औषधांची फवारणी करावी लागते त्यामुळे वाढत्या थंडीने द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले आहे.-------------------------गोदाकाठ भागात नदीच्या काठी पहाटे मोठ्या प्रमाणावर धुके पसरलेले असते. नदीच्या पाण्याचे बाष्पीभवन आणि झाडे ,गवत यावर पडलेले दवं यामुळे हवेत गारवा निर्माण होतो. धुके आणि गारवा शरीराला स्पर्श करतांना वेगळीच अनुभूती येत असली तरी प्राणी, काही पिके यांना त्रासदायक ठरू शकते- सागर पोटे, कोठूरे

टॅग्स :Nashikनाशिक