शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धुक्याचा द्राक्षबागा, पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 00:21 IST

येवला तालुक्यात आठ दिवसांपासून सकाळी धुके, दवं आणि दिवसभर ढगाळ वातावरण असल्यामुळे द्राक्षबागेवर डावणी, भुरी, अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने तसेच कांदा पिकही करपा, मावाच्या विळख्यात सापडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

ठळक मुद्देजळगाव नेऊर : शेतकरी सापडले आर्थिक संकटात

जळगाव नेऊर : येवला तालुक्यात आठ दिवसांपासून सकाळी धुके, दवं आणि दिवसभर ढगाळ वातावरण असल्यामुळे द्राक्षबागेवर डावणी, भुरी, अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने तसेच कांदा पिकही करपा, मावाच्या विळख्यात सापडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.सध्या शेतकर्यांची द्राक्ष बागेची डिपिंग, थिनिंग आदी कामे शेवटच्या टप्प्यात असल्याने व बहुतेक कामे आटोपल्याने शेतकरी आता ढगाळ वातावरणाने धास्तावले आहे. थंडीने द्राक्ष बागेच्या मण्यांना तडे जात असुन अहोरात्र मेहनत घेऊन शेतकर्यांवर संकटावर संकट येत असल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत. तसेच द्राक्षबागेला औषधे, बुरशीनाशके, कीटकनाशके यांचे अति प्रमाणात झाल्याने निर्यातक्षम द्राक्षबागेला अडचणी निर्माण होत आहेत.पहाटे दवं आणि धुके पडत असल्याने द्राक्ष बागेला शेकोटीचा आधार देत आहेत. भरमसाठ झालेला खर्चही वसूल होतो की नाही त्यामुळे द्राक्ष उत्पादक चिंतातुर झाल्याचे चित्र दिसत आहे.शेतकर्यांचे नगदी पीक म्हणून कांदा पिकाकडे बघितले जाते. पण त्यावरही करपा, मावा रोड आणि तुडतुड्यांनी आक्रमण केले आहे. औषधांची फवारणी करुनही कांदा पिकाची वाढ होत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.द्राक्षबागेच्या छाटणीपासून सुरू झालेली संकटांची मालिका सुरूच आहे. पीक हाती येते की नाही याची शाश्वती राहिलेली नाही. सुरुवातीलाच पावसामुळे घडामध्ये पन्नास टक्के कुज झाल्याने उरल्यासुरल्या द्राक्षबागेवरही ढगाळ वातावरणामुळे भुरी, डावणी रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने द्राक्षबागा वाचविण्यासाठी प्रयत्न करीत असताना मोठा खर्च होत असल्याचे जळगाव नेऊर येथील द्राक्ष उत्पादक बाबासाहेब शिंदे यांनी सांगितले. तर सततच्या ढगाळ वातावरणामुळे कांदे पिकावर करपा येऊन कांदे पिकास हानी पोहोचली आहे. औषधांचा खर्च भरमसाठ होत असून, त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होणार आहे, असे जऊळके येथील कांदा उत्पादक संतोष सोनवणे म्हणाले.

टॅग्स :agricultureशेतीonionकांदा