शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ ४८ मजुरांच्या चेहऱ्यावर झळकले स्मितहास्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 23:33 IST

कळवण : कामानिमित्त कळवण परिसरात असलेल्या, परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात जाहीर झालेल्या लॉकडाउननंतर अडकून पडलेल्या मजुरांना आपल्या घरी परतण्याची ओढ लागल्याने प्रशासनाच्या सहकार्यातून कळवण येथून मध्य प्रदेशातील ४८ मजुरांना त्यांच्या गावी पोहोचविण्यात आले.

कळवण : कामानिमित्त कळवण परिसरात असलेल्या, परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात जाहीर झालेल्या लॉकडाउननंतर अडकून पडलेल्या मजुरांना आपल्या घरी परतण्याची ओढ लागल्याने प्रशासनाच्या सहकार्यातून कळवण येथून मध्य प्रदेशातील ४८ मजुरांना त्यांच्या गावी पोहोचविण्यात आले.यावेळी गावी परतत असल्याच्या आनंदात मजुरांच्या चेहºयावर स्मितहास्य उमटत प्रशासनाप्रती कृतज्ञतेचे भाव दिसून आले.रोजगारासाठी मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड यांसह अनेक राज्यांतील मजूर, व्यावसायिक कळवण परिसरात आहेत. देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ मार्चला पहिला लॉकडाउन लागू केल्याने सर्व कामधंदे बंद झाले होते. हातावर पोट असणाºया या मजुरांसमोर रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे आपल्या गावी जाण्याची ओढ त्यांना लागली होती.शासनाने तिसºया टप्प्यात लॉकडाउनमध्ये शिथिलता आणत योग्य ती कार्यवाही पूर्ण करून गावी जाण्यास परवानगी दिल्याने या मजुरांना दिलासा मिळाला होता.या मजुरांना आपापल्या राज्यात जाण्यासाठी आॅनलाइन परवानगी घ्यावी लागत असल्यानेत्यांनी आॅनलाइन परवानगी मिळवल्यानंतर कळवणचे तहसीलदार बंडू कापसेयांनी मध्य प्रदेशातील एकूण ४८ मजुरांची यादी कळवणचे आगार प्रमुख हेमंत पगार यांच्याकडे दिली. या मजुरांना नाशिकरोड रेल्वे- स्थानकापर्यंत जाण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार येथील प्रशासनाने एस. टी. बसची सोय केली होती.कळवण बसस्थानकातून दोन बसेसमध्ये एकूण ४८ मजुरांना बसवून त्यांना नाशिकरोड रेल्वे स्थानक येथे सोडण्यात आले. तहसीलदार बंडू कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली कळवण बसस्थानकातून बस रवाना करतेवेळी नायब तहसीलदार डॉ. व्यंकटेश तुप्ते, आगारप्रमुख हेमंत पगार उपस्थित होते. नाशिकरोड रेल्वेस्थानकातून हे मजूर जिल्ह्यातील इतर मजुरांसह विशेष रेल्वेने मध्य प्रदेशकडे रवाना झाले. दोन महिन्यांनंतर आपल्या मूळ गावी परतता येत असल्याने मजुरांनी आनंद व्यक्त केला.---------------------------मध्य प्रदेशात जाण्यासाठी ४८ मजुरांनी नोंदणी केली होती. त्यानुसार सोशल डिस्टन्स ठेवून सर्व मजुरांना दोन बसमध्ये बसवून रवाना करण्यात आले. मजुरांना सोडताना योग्य काळजी घेण्यात आली.- बंडू कापसे,तहसीलदार, कळवण---------------------------------------------------------मजुरांना सोडण्यासाठी देण्यात आलेल्या सदर बसेस आधी निर्जंतुक करण्यात आल्या. मजुरांना सोडून कळवण येथे परतल्यानंतर सदर बसेस पुन्हा लगेच निर्जंतुक करण्यात आल्या.- हेमंत पगार,आगार व्यवस्थापक, कळवण

टॅग्स :Nashikनाशिक