शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

'स्मार्टसिटी : मेनरोडवरील वाहतूक मार्गात बदल; कालिदाससमोरील रस्त्यावर एकेरी वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 17:59 IST

काही दिवसांपासून पुन्हा व्यवसाय पुर्वपदावर येत असताना हा स्मार्टसिटीच्या रस्त्यांच्या कामाचा या भागात नारळ फूटणार असल्यामुळे व्यावसायिक वर्गही धास्तावला आहे.

ठळक मुद्देपावसाळ्यात वर्दळीच्या भागात रस्त्याच्या कामाला प्रारंभ ‘नो पार्किंग-हॉल्टींग झोन’ कालिदाससमोरून एकरी वाहतूक सुरू राहणार

नाशिक : स्मार्टसिटीअंतर्गत पहिल्या टप्प्यात मेनरोडवरील धुमाळ पॉइंट अर्थात वंदे मातरम चौकापासून जिजामाता चौकापर्यंतचा रस्ता विकसीत करण्यात येणार आहे. स्मार्टसिटीअंतर्गत केल्या जाणाऱ्या रस्ते विकासाच्या कामामुळे शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून वाहतूक मार्गात बदलाची अधिसूचना काढण्यात आली आहे. स्मार्टसिटीच्या कामाला अडथळा होऊ नये, यासाठी पहिल्या टप्प्यात जिजामाता चौकापासून ते गाडगेमहाराज पुलाकडे जाणा-या दहीपूलाच्या रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच दुस-या टप्प्यात वंदे मातरम चौक (धुमाळ पॉइंट) ते जिजामाता चौकापर्यंतच्या कामाला प्रारंभ केला जाणार आहे. यामुळे या भागातही वाहनांना प्रवेशबंदी असणार आहे, असे उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी काढलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे; मात्र पावसाळ्यात या गजबजलेल्या परिसरात ही कामे हाती घेणे कितपत योग्य आहे? असा सवाल या भागातील नागरिकांनी उपस्थित केला आहे. एकीकडे लॉकडाऊन काळात व्यवासाय पुर्णत: ठप्प झाला होता. काही दिवसांपासून पुन्हा व्यवसाय पुर्वपदावर येत असताना हा स्मार्टसिटीच्या रस्त्यांच्या कामाचा या भागात नारळ फूटणार असल्यामुळे व्यावसायिक वर्गही धास्तावला आहे. एकीकडे पावसाळा दुसरीकडे स्मार्टसिटीअंतर्गत सुरू होणारे रस्त्याचे काम अशा दुहेरी कात्रीत या भागातील व्यावसायिक सापडण्याची शक्यता आहे.पर्यायी मार्ग असा...* मेनरोडवरील वंदे मातरम चौकाकडून जिजामाता चौकाकडे जाणाºया वाहनांनी थेट गाडगे महाराज पुतळामार्गे विजयानंद चित्रपटगृहासमोरून थेट साक्षी गणेश मंदिरामार्गे पुढे मार्गस्थ होतील.* तसेच रविवार कारंजावरून खाली येत बोहरपट्टीकडे वळण घेत सराफ बाजारातून पुढे पर्यायी मार्गाने वाहनचालकांना जाता येईल, असे अधिसूचनेत म्हटले आहे. या अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्यांविरूध्द मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.‘नो पार्किंग-हॉल्टींग झोन’स्मार्टसिटीअंतर्गत या भागात करण्यात येणाºया रस्त्याच्या कामामुळे वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूकीची कोंडी होऊ नये म्हणून आता वाहतूक शाखेने वंदे मातरम चौक ते जिजामाता चौक आणि सराफ बाजार (सरस्वती लेन) ते थेट बादशाही कॉर्नर (भद्रकाली) पर्यंत कुठल्याही प्रकारच्या वाहने पार्किंग करता येणार नाही आणि वाहनांना या मार्गावर थांबण्यासही बंदी घालण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांविरूध्द पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. 

कालिदास कलामंदिरासमोरील रस्त्यावर एकेरी वाहतूकस्मार्टसिटीअंतर्गत अण्णा भाऊ साठे पुतळ्यापासून तर थेट महात्माफुले कलादालनापर्यंतच्या रस्त्याच्या कामाला ऐन पावसाळ्यात प्रारंभ केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात रस्त्याची उजवी आणि त्यानंतर डावी बाजू अशा दोन टप्प्यात हा रस्ता विकसीत करण्यात येणार असल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक यापुढे एकेरी होईल, अशी अधिसूचना शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून प्रसिध्द करण्यात आली आहे.अण्णा भाऊ साठे पुतळ्यापासून तर थेट महात्मा फुले कलादालन भालेकर मैदानासमोरील बाजूने रस्त्याच्या कामाला सुरूवात होत आहे. यामुळे त्याच्या विरूध्द बाजूने कालिदाससमोरून एकरी वाहतूक सुरू राहणार असल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे. ही अधिसूचना रस्त्याचे काम पुर्णत्वास येईपर्यंत लागू राहणार असल्याचे वाहतूक शाखेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.वाहनचालकांनी शिवसेना कार्यालयाकडून जिल्हा परिषदेकडे जाण्यासाठी वरील रस्त्यांचा वापर पुर्णपणे थांबवावा त्याऐवजी शालिमारवरून सीबीएसमार्गे त्र्यंबकनाका सिग्नलवरून वळण घेत जिल्हा परिषदेकडे यावे. अण्णा भाऊ साठे चौकापासून तर थेट शिवसेना कार्यालयापर्यंतच्या रस्त्यावर कुठल्याहीप्रकारची वाहने उभी केली जाणार नाही व कोणतेही वाहन रस्त्यांवर कुठल्याही कारणास्तव थांबणार नाही, हा संपूर्ण भाग नो पार्किंग-हॉल्टींग झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाTrafficवाहतूक कोंडीSmart Cityस्मार्ट सिटी