शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

मौजे सुकेणे ठरले निफाड तालुक्यातील ‘स्मार्ट गाव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 00:10 IST

राज्य शासनाच्या स्मार्ट ग्राम स्पर्धेत निफाड तालुक्यातून मौजे सुकेणे गावाने बाजी मारत दहा लाखांचा पुरस्कार प्राप्त केला आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील सुमारे १२५, तर निफाड तालुक्यातून १५ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला होता.

कसबे सुकेणे : राज्य शासनाच्या स्मार्ट ग्राम स्पर्धेत निफाड तालुक्यातून मौजे सुकेणे गावाने बाजी मारत दहा लाखांचा पुरस्कार प्राप्त केला आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील सुमारे १२५, तर निफाड तालुक्यातून १५ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला होता. राज्य शासनाच्या स्मार्ट ग्राम स्पर्धेचे सर्व निकष पूर्ण केल्याने मौजे सुकेणे गावाला स्मार्ट गावाचा बहुमान प्राप्त होऊन सुमारे दहा लाखांचा पुरस्कार जाहीर झाला आहे, अशी माहिती सरपंच वृषाली भंडारे, ग्रामविकास अधिकारी श्रीमती एस. जी. सनेर यांनी दिली.  दत्त मंदिर देवस्थानासाठी प्रसिद्ध अस-लेल्या श्रीक्षेत्र मौजे सुकेणे गावाला आता स्मार्ट गावाच्या बहुमानाचे कोंदण लाभले आहे. लोकसहभाग आणि स्वच्छतेकडून समृद्धीकडे असा प्रवास करणाºया गावाने या योजनेसाठी वैयक्तिक शौचालय सुविधा व वापर, सार्वजनिक इमारतीतील शौचालय सुविधा व वापर, पाणी गुणवत्ता तपासणी, सांडपाणी, घनकचरा, पायाभूत सुविधांचा विकास, आरोग्य व शिक्षणविषयक सुविधा, केंद्र व राज्य पुरस्कार योजनांची अंमलबजावणी, महिलांचे बचतगट, प्लॅस्टिक वापर बंदी, वीजबिल भरणा, लेखा परीक्षण पूर्तता, ग्रामसभेचे आयोजन, लोकसहभाग, सौर पथदीप, एलईडी दिव्यांचा वापर, बॉयोगॅस यंत्रांचा वापर, वृक्षलागवड, जलसंधारण, संगणकीकरण सुविधा या सर्व निकषांची पूर्तता केल्याने मौजे सुकेणेची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.  या पुरस्कारासाठी व ग्रामविकासासाठी माजी सरपंच सुरेखा गडाख, सरपंच वृषाली भंडारे, नंदराम हांडोरे, विजय मोगल, संतु काळे, कावेरी मोगल, विमल भोई, भारती चव्हाण, शीला पारधे, संदेश मोगल, नंदू भोई यांनी परिश्रम घेतले, अशी माहिती विराज पाटील यांनी दिली.लोकसहभागामुळे यशमौजे सुकेणे गावाला स्मार्ट गाव पुरस्काराचा बहुमान हा लोकसहभाग आणि संपुर्ण गावाच्या सहकार्यामुळेच लाभला आहे. राज्यातील एक आदर्श स्मार्ट गाव साकारण्याचा आमचा मानस आहे. - वृषाली भंडारे, सरपंच मौजे सुकेणे गावाने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातही तृतीय क्रमांकाचे पाच लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले आहे. गत पाच वर्षांत मौजे सुकेणे ग्रामपंचायतीला चार पुरस्कार प्राप्त झाले आहेत. क वर्ग तीर्थस्थळ व पर्यटनस्थळ विकास योजनेतूनही विविध विकासकामे प्रस्तावित असल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाने दिली.

टॅग्स :Nashikनाशिक