शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट’ पोलीस ठाण्याचा गलथान कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:08 IST

‘स्मार्ट’ पोलीस ठाणे म्हणून ओळख असलेल्या पंचवटी पोलीस ठाण्यामधील गलथान कारभार दस्तुरखुद्द पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी ठाणेप्रमुखांची कानउघाडणी केली.

पंचवटी : ‘स्मार्ट’ पोलीस ठाणे म्हणून ओळख असलेल्या पंचवटी पोलीस ठाण्यामधील गलथान कारभार दस्तुरखुद्द पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी ठाणेप्रमुखांची कानउघाडणी केली. एका कौटुंबिक वादाच्या घटनेत प्राणघातक हल्ल्याचा लावलेला कलम बदलण्यासह कामकाजात सुधारणा करण्याचे आदेश देत अवघ्या दहा मिनिटांत त्यांनी संतापून पोलीस ठाण्यातून निघून जाणे पसंत केले.नवनियुक्त आयुक्त नांगरे पाटील यांनी बुधवारी (दि.१३) दुपारी दोन वाजता पंचवटी पोलीस ठाण्याला अचानक भेट दिली. यावेळी कोठडीत असलेल्या गुन्हेगारांची चौकशी केली. त्यांच्या अचानक भेटीमुळे पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचीच धावपळ उडाली. ‘स्मार्ट’ म्हणून मिरवून घेणाºया पंचवटी पोलिसांचा गलथान कारभार पाहून नांगरे पाटील यांनाही धक्का बसला.कौटुंबिक वादातून झालेल्या मारहाणीच्या घटनेत प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा कसा? असा प्रश्न आयुक्तांनी करताच ठाणे अंमलदाराची भंबेरी उडाली. यावेळी आयुक्त नांगरे पाटील यांनी थेट सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देऊन अदखलपात्र गुन्हा नोंदवा, असे बजावले. आयुक्तांच्या नजरेतून पोलीस ठाण्याचा गलथान कारभार सुटू शकला नाही.दिवसभर भेटीची चर्चानांगरे पाटील यांच्या अचानक पंचवटी पोलीस ठाणे भेटीची दिवसभर परिसरात चर्चा सुरू होती. त्यांच्या अशा धडक भेटीमुळे अन्य पोलीस ठाणे प्रमुखांचेही धाबे दणाणले असून, काही ठाणेदारांनी तर तत्काळ वाहन सोडून पायी रस्त्यावर अवतरत ‘एरिया डॉमिनेशन’ करणे सुरू केले आहे. या भेटीनंतर एक मात्र स्पष्ट झाले आहे, ते म्हणजे कधीही कोणत्याही पोलीस ठाण्यात नांगरे पाटील अवतरू शकतील.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेVishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटील