शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक शहरात  २१ कोटींची स्मार्ट लायटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 01:01 IST

शहरात असलेल्या ८२ हजार विद्युत पथदीपांची अवस्था आता सुधारणार असून, स्मार्ट सिटी अंतर्गत अद्ययावत पथदीप बसविण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे मागासवर्गीय प्रभागातदेखील अडीच हजार पथदीप बसवण्यात येणार आहे.

नाशिक : शहरात असलेल्या ८२ हजार विद्युत पथदीपांची अवस्था आता सुधारणार असून, स्मार्ट सिटी अंतर्गत अद्ययावत पथदीप बसविण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे मागासवर्गीय प्रभागातदेखील अडीच हजार पथदीप बसवण्यात येणार आहे.गेल्या काही वर्षांत शहरात एलइडी पथदीप बसविण्याच्या नावाखाली शहरातील बहुतांशी रस्त्यावरील पथदीपांची देखभाल दुरुस्ती रखडली होती, महापालिकेच्या स्थायी समितीच्या आणि प्रभाग समित्यांमध्ये अनेकदा हा विषय गाजला होता. मनसेच्या कारकिर्दीत एलइडी घोटाळ्याचा विषय थांबला असला तरी ठेकेदाराने न्यायालयात धाव घेतल्याने हा विषय प्रलंबित होता. दरम्यान, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कामाची निकड, तांत्रिक व्यवहार्यता आणि निधीची उपलब्धता या त्रिसूत्रीच्या आधारे विद्युत विभागाच्या प्रलंबित विषयाला हात घातला. विशेषत: महापालिकेच्या अ‍ॅपवर येणाऱ्या तक्रारी आणि वॉक विथ कमिशनर या उपक्रमांच्या आधारे आलेल्या तक्रारींच्या आधारे त्यांनी आढावा घेतल्यानंतर पथदीपांच्या विषयांना प्राधान्य दिले.  महापालिकेच्या २०१८-१९ या आर्थिक अंदाजपत्रकात विद्युती करणासाठी असलेल्या तरतुदीच्या आधारे सात कोटी ३० लाख रुपयांच्या रकमेची निविदा काढण्यात आली होती, ती सध्या कार्यवाहीत असून, याच महिन्याच्या आधारे याच महिन्याच्या अखेरीस पथदीप बसविण्यास प्रारंभ होणार आहे, याशिवाय मनपाच्या मागासवर्गीय प्रभागात २४८० पथदीप उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी ५ कोटी ३७ लाख रुपये खर्चाच्या निविदा काढण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक व पंचवटीतील जुने गावठाण येथे २४३६ पथदीप उभारण्यात येणार असून, त्यासाठी ८ कोटी ६५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याची निविदा प्रसिद्ध झाली असून, या वर्षाच्या अखेरीस ७५८५ नवे पथदीप उभारण्यात येतील, त्याचप्रमाणे सर्व जुन्या अस्तित्वातील खांबावरील जुने दिवे बदलून नवे एलइडी दिवे बसविण्यात येणार आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका