शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
2
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
3
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
4
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
5
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
6
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
7
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
8
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
9
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
10
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
11
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
12
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
13
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
14
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
15
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
16
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!
17
पाकिस्तानी हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी चीनची पडद्यामागून मोठी खेळी; भारतासाठी नवं आव्हान?
18
जे इंग्रजांनाही जमले नाही, ते पंतप्रधान मोदींनी करुन दाखवले; ओमर अब्दुल्लांकडून स्तुतीसुमने
19
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला पाकिस्तान भारताला सोपवणार?; मुलगा तल्हा सईदचा खुलासा
20
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारी हनुमान मंदिरात गुप्तपणे का केले जाते काडेपेटीचे दान? 

‘स्मार्ट सिटी’चा प्रस्ताव महासभेच्या पटलावर

By admin | Updated: December 2, 2015 00:04 IST

आज निर्णय : करवाढीस सर्वपक्षियांचा विरोध

नाशिक : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानातील दुसऱ्या टप्प्यात उत्तीर्ण होण्यासाठी महापालिकेने तयार केलेला प्रस्ताव बुधवारी (दि.२) होणाऱ्या महासभेच्या पटलावर मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. महासभेच्या मान्यतेची मोहोर उमटल्यानंतर सदर प्रस्ताव राज्य शासनाच्या उच्चतम समितीला सुपूर्द केला जाणार असून, राज्य शासनाकडून केंद्राला १५ डिसेंबरपर्यंत सादर केला जाणार आहे. दरम्यान, स्मार्ट सिटी अभियानांतर्गत होणाऱ्या विकासाचे स्वागत करताना सर्वपक्षीय सदस्यांनी त्यानिमित्त होणाऱ्या करवाढीस मात्र कडाडून विरोध दर्शविला आहे. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानातील पहिल्या टप्प्यात देशभरातील १०० शहरांमध्ये नाशिक शहराची निवड झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील चॅलेंज स्पर्धेसाठी गेल्या दोन-तीन महिन्यांपासून महापालिकेमार्फत प्रस्ताव तयार केला जात आहे. क्रिसिल संस्थेच्या मदतीने महापालिकेने प्रस्ताव तयार केला असून, सदर प्रस्तावाला महासभेची मान्यता आवश्यक आहे. गेल्या दोन महिन्यांत प्रशासनाने स्मार्ट सिटीबाबत नाशिककरांमध्ये वातावरणनिर्मिती केली असली तरी त्याविषयी अनेक मतभेद असून, लोकप्रतिनिधींनीही त्यानिमित्त होणाऱ्या करवाढीस विरोध दर्शविला आहे. त्यापार्श्वभूमीवर बुधवारी होणाऱ्या महासभेत सर्वपक्षियांच्या भूमिकेकडे नाशिककरांचे लक्ष लागून आहे. प्रस्तावात प्रामुख्याने, क्षेत्रविकासांतर्गत जुने नाशिक आणि पंचवटी परिसरातील गावठाणाचा भाग विचारात घेण्यात आला आहे. हरितक्षेत्र विकासांतर्गत शहराच्या मध्यभागाशी संलग्न असलेल्या हनुमानवाडी, मखमलाबाद शिवारातील क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. स्मार्ट वैशिष्ट्यांनी भरलेल्या या प्रस्तावात क्षेत्र विकास प्रकल्प आणि पॅनसिटी प्रकल्पाची अंदाजित किंमत सुमारे दोन हजार कोटी रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय प्रस्तावात राज्य व केंद्र सरकारच्या सर्व योजनांची सांगड घालण्यात आली आहे. अनेक कामे पीपीपी किंवा सीएसआर अंतर्गत करण्याचे प्रस्तावित आहे. स्मार्ट सिटी अभियानांतर्गत विकासाचे स्वप्न दाखवितानाच महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठीही प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. प्रामुख्याने घरपट्टी, पाणीपट्टी, घनकचरा व्यवस्थापनासह अन्य विविध करांमध्येही वाढ करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.