शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

मूळ प्रश्न ‘जैसे थे’ ठेवूनच आज स्मार्ट सिटीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 00:54 IST

स्काडा मीटरच्या निविदेत घोळ, संचालकांना अंधारात ठेवणे आणि अन्य तक्रारींमुळे गेल्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांची बदली झाल्याशिवाय बैठकीस उपस्थित न राहण्याचा इशारा नाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या महापालिकेतील पदाधिकारी संचालकांनी दिला होता.

नाशिक : स्काडा मीटरच्या निविदेत घोळ, संचालकांना अंधारात ठेवणे आणि अन्य तक्रारींमुळे गेल्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांची बदली झाल्याशिवाय बैठकीस उपस्थित न राहण्याचा इशारा नाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या महापालिकेतील पदाधिकारी संचालकांनी दिला होता. त्यानुसार ही बैठक रद्दही झाली, परंतु आता थविल हे कायम असतानाच पुन्हा कंपनीची बैठक गुरुवारी (दि.१८) होत असून, त्यामुळे आता महापौर आणि अन्य पदाधिकारी संचालक काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून आहे.नाशिक महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीचा कारभार अगोदरच वादग्रस्त असून, त्यात अनेक वादांची भर पडली आहे. मध्यंतरी जलमापनासाठी संपूर्ण शहरासाठी स्काडा मीटर बसविण्याच्या निविदेतील परस्पर बदलांमुळे मोठा घोटाळा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यावरून संचालकांनी आरोप केले, परंतु हेच निमित्त करून स्मार्ट सिटी कंपनीचा रखडलेला रस्ता आणि त्यातील  आयटम कमी होऊनही वाढीव चार कोटी रुपयांची रक्कम देण्याचा घातलेला घाट, फुले कलादालनाचे सदोष काम असे अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले होते, परंतु सर्वात महत्त्वाचा मुद्दा येथील कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांच्या वागणुकीसंदर्भात होता. थविल यांच्या बोलण्याची पद्धत, संचालकांना माहिती न देणे आणि अन्य अनेक आरोप त्यांच्यावर होते. संचालकांना माहिती न देताच परस्पर ते कार्यक्रम ठरवितात तसेच माहिती देण्यास टाळाटाळ करतात, असा आक्षेप होता. दर तीन महिन्यांनी स्मार्ट सिटी कंपनीची बैठक होणे बंधनकारक आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या बैठकीच्या दिवशी सर्व संचालकांनी संताप व्यक्त केला होता. बैठक सुरू होण्याच्या आतच कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांची कंपनीचे संचालक असलेल्या महापौर रंजना भानसी, दिनकर पाटील, शाहू खैरे, गुरुमित बग्गा अशा सर्व संचालकांनी भेट घेऊन जोपर्यंत थविल यांची बदली होत नाही तोपर्यंत बैठकीस हजर राहणार नाही, असे निक्षून सांगितल्याने कुंटे यांनी बैठक रद्द केली होती. इतकेच नव्हे तर थविल यांच्या ऐवजी अन्य अधिकारी शोधावा लागेल, असेही सांगितले होते.इलेक्ट्रिक सायकलींचे ऐनवेळी उद्घाटनसायकल शेअरिंगमध्ये आता इलेक्ट्रिकल सायकलींची भर पडली असून, त्याचे उद्घाटन गुरुवारी (दि.१८) दुपारी म्हणजे बैठकीच्या ऐनवेळी राजीव गांधी भवनातील सायकल डॉकवर होणार आहे. तथापि, अनेक संचालकांना बुधवारी (दि.१७) पत्र मिळाल्यानंतरच हा प्रकार कळला. त्यामुळे त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी