शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटी कंपनीचे रखडले लेखा परीक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 01:10 IST

शहर स्मार्ट करण्यासाठी महापालिकेने स्थापन केलेल्या एसयूव्ही म्हणजेच स्मार्ट सिटी कंपनीचे कामकाज सुरू होऊन दोन वर्षांचा कालावधी उलटला आहे. परंतु शासनाचे कोट्यवधी रुपये असूनदेखील ही प्रायव्हेट कंपनी असल्याचे दाखवत कॅगने लेखा परीक्षण करण्यास नकार दिला आहे. तथापि, त्यात सुमारे ९०० कोटी रुपये शासनाचेच असल्याने त्याचे आॅडिट करावे, अशी विनंती करण्यात आली आहे. त्यासाठी कंपनीच आता पत्रव्यवहार करीत आहेत.

ठळक मुद्देकॅगचा नकार : शासनाशी पत्रव्यवहार सुरू

नाशिक : शहर स्मार्ट करण्यासाठी महापालिकेने स्थापन केलेल्या एसयूव्ही म्हणजेच स्मार्ट सिटी कंपनीचे कामकाज सुरू होऊन दोन वर्षांचा कालावधी उलटला आहे. परंतु शासनाचे कोट्यवधी रुपये असूनदेखील ही प्रायव्हेट कंपनी असल्याचे दाखवत कॅगने लेखा परीक्षण करण्यास नकार दिला आहे. तथापि, त्यात सुमारे ९०० कोटी रुपये शासनाचेच असल्याने त्याचे आॅडिट करावे, अशी विनंती करण्यात आली आहे. त्यासाठी कंपनीच आता पत्रव्यवहार करीत आहेत.स्मार्ट सिटी हा केंद्र शासनाचा उपक्रम असून, त्या अनुषंगाने महापालिका तो राबवित आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत असलेली कामे नियमित महापालिकेच्या कामकाजात रखडू नये यासाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार एसपीव्ही स्थापन करण्याची कार्यवाही महापालिकेने केली असून, नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपिंग कंपनी स्थापन करण्यात आली आहे. नाशिक महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीचा १०८४ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला असून, त्यात ९४० कोटी रुपये केंद्र आणि राज्य शासनाकडून मिळणार आहेत. आत्तापर्यंत अडीचशे कोटी रुपयांहून अधिक रक्कमदेखील प्राप्त झाली आहे. तथापि, सुरू असलेल्या कामांचे विशेष: कंपनीचा आर्थिक ताळेबंद तपासणीचे काम शासनाने केलेले नाही.कंपनीने स्वत:च आॅडिटर नेमून तपासणीचे काम केले असले तरी प्रत्यक्षात सीएजी म्हणजेच कॅगने तपासणी केलेली नाही. ही खासगी कंपनी असल्याने ते काम करण्यास कॅग तयार नसल्याचे सांगितले जात असले तरी लेखा परीक्षण करावे, यासाठी कंपनीनेच पाठपुरावा सुरू केला आहे.चर्चेला उधाणनाशिक महापालिकेने यापूर्वी कुंभमेळ्याची कामे केली त्यावेळी केंद्र किंवा राज्य शासनाचा निधी दिल्याने त्याचे आॅडिट केले गेले, परंतु आता मात्र शासनाचे हजार कोटी रुपये आणि महापालिकेची उर्वरित रक्कम असतानादेखील आॅडिट का टाळले जात आहे, हा मात्र चर्चेचा विषय ठरला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी