शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटी कंपनीची आजची बैठक गाजणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 00:52 IST

नाशिक : स्मार्ट सिटी कंपनीचे बहुतांशी सर्वच प्रकल्प वादग्रस्त ठरले असून, या घोळांचा ठपका कंपनी प्रशासनाने सल्लागार संस्थेवर ठेवला आहे. याशिवाय रखडलेला स्मार्ट रोड, गोदाघाटातील तळ कॉँक्रिटीकरण हटविण्याचा प्रश्न यासह अन्य अनेक प्रस्तावांवर सोमवारी (दि.३०) होणाऱ्या कंपनीच्या बैठकीत चर्चा होणार आहे. त्यामुळे यंदाच्या बैठकीत काही ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देवादग्रस्त प्रस्ताव : सल्लागार समितीच्या कारभारासह प्रलंबित कामांचा फैसला

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : स्मार्ट सिटी कंपनीचे बहुतांशी सर्वच प्रकल्प वादग्रस्त ठरले असून, या घोळांचा ठपका कंपनी प्रशासनाने सल्लागार संस्थेवर ठेवला आहे. याशिवाय रखडलेला स्मार्ट रोड, गोदाघाटातील तळ कॉँक्रिटीकरण हटविण्याचा प्रश्न यासह अन्य अनेक प्रस्तावांवर सोमवारी (दि.३०) होणाऱ्या कंपनीच्या बैठकीत चर्चा होणार आहे. त्यामुळे यंदाच्या बैठकीत काही ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.स्मार्ट सिटी कंपनीचे कामकाज सुरू होऊन चार वर्षे झाली आहेत. परंतु कंपनीला लागलेले वादांचे ग्रहण कायम आहे. दोन वर्षांपूर्वी सुरू झालेला त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ स्मार्टरोडचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्याच्या गुणवत्तेविषयी शंका घेतली जात आहे. कालिदास कलामंदिराच्या कामाबाबत ओरड कायम आहे. परंतु फुले कलादालनाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्या कामासाठी वाढीव खर्च मोजावा लागला अशा अनेक कामांचे खापर कंपनी व्यवस्थापनाने केपीएमजी या सल्लागार कंपनीवर फोडले आहे. कंपनीकडून पुरेशा प्रमाणात तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध होत नाही, तांत्रिक व्यवहार्यता तपासली जात नाही तसेच वेळेत प्रकल्प पूर्ण होऊ शकलेले नाही अशा प्रकारचा ठपका ठेवण्यात आला आहे. याशिवाय पंचवटीतील पं. पलुस्कर सभागृहाच्या नूतनीकरणाचा खर्चदेखील वाढला आहे. याशिवाय गावठाण विकासाच्या निविदा मंजूर होऊनदेखील काम रखडले आहे. जे रस्ते गेल्या कुंभमेळ्यात तयार करण्यात आले, त्यांचे काँक्रिटीकरण फोडून सर्व्हीस लाइन टाकण्याचा प्रस्ताव वादात सापडला आहे. नव्या वर्षात पे अ‍ॅण्ड पार्कशहरात स्मार्ट पार्किंगसाठी कंपनीने पीपीपीअंतर्गत प्रकल्प राबविण्याचे ठरविले आहे. त्यानुसार आॅफ स्ट्रीट म्हणजे रस्त्याच्या कडेला पार्किंग केली जाणार आहे. त्यासाठी रस्त्यावर पट्टे आखण्यात आले असून, तेच वादग्रस्त ठरल्याने यापूर्वी शुल्क वसुलीला स्थगिती देण्यात आली आहे. नव्या वर्षात पे अँड पार्क सुरू करण्याबाबत निर्णय होऊ शकतो.

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटीNashikनाशिक