शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मांसाहार खालेल्लं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
2
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
3
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
4
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
5
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
6
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
7
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
8
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
9
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
10
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
11
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
12
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
13
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
14
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
15
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
16
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
18
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
19
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
20
IB Recruitment: गुप्तचर विभागात ज्युनियर ऑफिसर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता

स्मार्ट सिटी कंपनी : निविदांचा कालावधी ४५ दिवसांवर आणण्याचा निर्णय माहिती तंत्रज्ञानाधारित १२० कोटींचे प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 01:18 IST

नाशिक : माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित १२० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांच्या निविदा काढण्यास नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

ठळक मुद्देवार्षिक अंदाजपत्रकात सुधारणा निविदा कालावधी ४५ दिवसांचा

नाशिक : माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित १२० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांच्या निविदा काढण्यास नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. सदर प्रकल्पांना गती मिळण्यासाठी ९० दिवसांचा निविदा कालावधी ४५ दिवसांवर आणण्याचाही महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला.स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी, माहिती तंत्रज्ञानाधारित प्रकल्पांची व्याप्ती पाहता कंपनीच्या वार्षिक अंदाजपत्रकात सुधारणा करण्यात आली. यावेळी, माहिती तंत्रज्ञानाधारित १२० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांच्या निविदाप्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली. या प्रकल्पांमध्ये प्रामुख्याने, स्मार्ट सिटी आॅपरेशन सेंटर, स्मार्ट कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटर, सिटिझन एक्सपिरियन्स सेंटर, इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम, स्मार्ट पार्किंग मॅनेजमेंट सिस्टम याशिवाय, सेन्सर, वायफाय सिस्टम यांचा समावेश आहे. सदर प्रकल्पांना गती मिळावी यासाठी निविदा कालावधी ४५ दिवसांचा करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय, बैठकीत जनसंपर्क अधिकारी, लघुलेखक यांच्यासह आठ तांत्रिक पदांनाही मंजुरी देण्यात आली. यावेळी, सुरक्षित नाशिकचा आढावा घेण्यात आला. पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी त्यातील काही अडचणी सांगितल्या. आॅप्टिकल फायबर नेटवर्कचे जाळे निर्माण करण्यासाठी राज्य माहिती व तंत्रज्ञान महामंडळाचे बदललेले सचिव श्रीनिवासन यांच्याशी चर्चा करण्याचे ठरले. सोलर पॅनल आणि पायलट स्मार्ट रोडच्या निविदा प्रसिद्ध झाल्याची माहिती यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांनी दिली. येत्या सप्ताहात आयसीटी इन्फ्रास्ट्रक्चर, स्मार्ट पथदीप, स्मार्ट पार्किंग, पब्लिक सायकल शेअरिंग, प्रोजेक्ट गोदाअंतर्गत पायाभूत सुविधा व सुशोभिकरण या प्रकल्पांच्याही निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. बैठकीला, कंपनीचे संचालक महापौर रंजना भानसी, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृहनेता दिनकर पाटील, विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, तज्ज्ञ संचालक तुषार पगार यांच्यासह अन्य संचालक, अधिकारी उपस्थित होते.संचालक मंडळाच्या नियुक्त्या कायमसंचालक मंडळाची बैठक होण्यापूर्वी कंपनीची वार्षिक सभा झाली. यावेळी, महापौर रंजना भानसी, महापौर रंजना भानसी, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृहनेता दिनकर पाटील, विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, तज्ज्ञ संचालक तुषार पगार, केंद्रीय शहर विकास मंत्रालयाच्या सचिव रेणू सतिजा, सिडकोच्या सहसंचालक प्राजक्ता लवंगारे, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांच्या नियुक्त्या कायम करण्यात आल्या. याशिवाय, लेखापरीक्षक म्हणून साबद्रा अ‍ॅण्ड साबद्रा कंपनीची, तर सनदी लेखापाल म्हणून उल्हास बोरसे अ‍ॅण्ड कंपनी यांची नियुक्ती करण्यात आली. सनदी लेखापालाने तर मासिक पाच हजार रुपये मानधनावर काम करण्याची तयारी दाखविली आहे.