शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

उद्योग मंत्रालयाचे लघुउद्योग धोरण कागदावरच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 00:32 IST

मोठ्या उद्योगांपेक्षा लहान उद्योग हे अधिक रोजगार निर्माण करीत असतात. त्यामुळे अशा उद्योगांसाठी स्वतंत्र धोरण राज्य शासन तयार करेल, अशी घोषणा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली खरी; मात्र नाशिकमध्ये याबाबत तीन महिने उलटून गेल्यानंतरही कोणत्याही प्रकारचे धोरण झालेले नाही.

ठळक मुद्देतीन वर्षांपासून घोषणा : उद्योजकांना प्रतीक्षा

नाशिक : मोठ्या उद्योगांपेक्षा लहान उद्योग हे अधिक रोजगार निर्माण करीत असतात. त्यामुळे अशा उद्योगांसाठी स्वतंत्र धोरण राज्य शासन तयार करेल, अशी घोषणा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली खरी; मात्र नाशिकमध्ये याबाबत तीन महिने उलटून गेल्यानंतरही कोणत्याही प्रकारचे धोरण झालेले नाही. इतकेच नव्हे तर नियमित औद्योगिक धोरणच झालेले नसल्याने लघुउद्योजक बुचकळ्यात पडले आहेत. मुळात केंद्राप्रमाणे राज्यात लघुउद्योग हे स्वतंत्र खाते नसताना त्याचे धोरण होणेच कठीण असून, त्यासाठी आधी हे क्षेत्र वेगळे करावे लागेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.राज्य शासनाच्या नियमित औद्योगिक धोरणाची मुदत संपुष्टात आली. नवीन औद्योगिक धोरण ठरविण्याचे काम सुरू असल्याने आधी सहा महिने मुदतवाढ देण्यात आली. त्या कालावधीत नवे धोरण आखण्याची कार्यवाही पूर्ण न झाल्याने आणखी सहा महिने मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत सप्टेंबर महिन्यात संपणार असून, त्या आधी नवे औद्योगिक धोरण आखले जाणार आहे. त्यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाशिकसह राज्यात विभागीय स्तरावर बैठका घेतल्या आहेत; मात्र तत्पूर्वी २०१५ मध्ये नाशिकमध्ये निमा इंडेक्स या औद्योगिक प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी लघुउद्योगांसाठी स्वतंत्र धोरण आखण्याची घोषणा केली होती. त्याचा मात्र मागमूसही दिसत नसल्याचे चित्र आहे.राज्यातील मोठे उद्योग हे पात्रताधारकांनाच रोजगार देत असतात; परंतु लघुउद्योगांचे तसे नसते. त्यात कुशल आणि अकुशल कामगारांना रोजगार मिळतो. अगदी ज्याला काहीच येत नाही अशा व्यक्तींना हेल्पर म्हणून घेऊन त्यालाही कुशल कामगार केले जाते. त्यामुळे रोजगार देण्यात लघुउद्योजक खूप आघाडीवर असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी स्वतंत्र औद्योगिक धोरण केले जाईल, अशी घोषणा उद्योगमंत्र्यांनी तीन वर्षांपूर्वी केली होती; मात्र अद्यापही ती अंमलात आलेली नसून राज्य सरकारच्या कालावधी पूर्णत्वाच्या आत हे धोरण आखले जावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.वस्त्रोद्योग धोरण वेगळे घोषितराज्यात पूर्वी एकच औद्योगिक धोरण असले तरी कालांतराने त्यात बदल करण्यात आला असून, आता वाइन उद्योग धोरण, महिला उद्योग धोरण त्याचप्रमाणे वस्त्रोद्योग धोरण वेगळे घोषित करण्यात आले आहेत. साहजिकच लघुउद्योगांसाठी स्वतंत्र औद्योगिक धोरण करायचे ठरल्यास तेदेखील साकारले जाऊ शकते, असे उद्योजक मानतात.

टॅग्स :businessव्यवसायNashikनाशिक